Bharat Bandh 
सोलापूर

भारत बंद आंदोलनादरम्यान माजी आमदार आडम मास्तरसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगधंद्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात भारत बंद आंदोलन करत असताना जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट येथे ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बझार पोलिस ठाणे येथे दाखल केले. 

सुरवातीला पूनम गेट येथे सिद्धप्पा कलशेट्टी, अशोक बल्ला, विजय हरसुरे, मल्लेशम कारमपुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अनिल वासम हे आंदोलन स्थळी नसताना रस्त्याच्या पलीकडे जाऊन पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले व अन्य अधिकाऱ्यांनी घेराव घालून बळजबरीने ओढत नेऊन पोलिसांच्या गाडीत घातले. तेव्हा गाडीतच पोलिसांच्या दडपशाही विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनिल वासम यांनी खासगीकरण हाणून पाडा व भारत बंद यशस्वी करा, अशा आशयाचे डिजिटल जॅकेट घालून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. 

यानंतर पूनम गेट येथे माजी आमदार आडम व ऍड. एम. एच. शेख हे दाखल होताच सर्व कार्यकर्ते एकत्र जमले. तेव्हा लगेच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. 

तत्पूर्वी श्री. आडम यांनी, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 26 मार्चला दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असून, अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खासगीकरण करून देशाला भांडवलदारांच्या हाती सुपूर्त करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून सरकार पोलिस यंत्रणा हाताशी धरून भारत बंद आंदोलन मोडून काढत आहे. पोलिसांच्या दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही. या कृतीचा तीव्र निषेध करत असत, याहून अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारला अस्वस्थ करण्याचा निर्धार श्री. आडम यांनी केला. 

या आंदोलनादरम्यान नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, रा. गो. म्हेत्रस, चन्नप्पा सावळगी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, दाऊद शेख, जावेद सगरी, अकिल शेख, शंकर म्हेत्रे, बाबू कोकणे, श्रीनिवास गड्डम, किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, बाळासाहेब मल्याळ, आसिफ पठाण आदींसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT