Corona 
सोलापूर

कोरोना : "या' तालुक्‍यात आठ दिवसांत 828 रुग्णांची भर; गुरुवारी 108 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गुरुवार (ता. 17) प्राप्त अहवालानुसार 108 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या 2745 वर तर मृतांची संख्या 57 वर गेली आहे. 

माळशिरस तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण माळशिरस तालुक्‍यात आढळले आहेत. गुरुवारी प्राप्त अहवालात 108 रुग्ण आढळले असून एकूण 2745 रुग्णांपैकी आजअखेर 1491 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 1197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच गुरुवारच्या अहवालानुसार तालुक्‍यातील नातेपुते येथील एक व माळशिरस येथील एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजअखेर एकूण 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तालुक्‍यात गेल्या आठ दिवसात दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी (ता. 10) 106, शुक्रवारी (ता. 11) 81, शनिवारी (ता. 12) 93, रविवारी (ता. 13) 106, सोमवारी (ता. 14) 133, मंगळवारी (ता. 15) 85, बुधवारी (ता. 16) 116 रुग्ण तर गुरुवारी 108 असे या आठ दिवसांतच एकूण 828 रुग्णांची भर पडली आहे. 

तालुक्‍यातील अकलूज, यशवंतनगर व संग्रामनगर या तीन गावांत शुक्रवारी (ता. 11) पासून सुरू असलेल्या आठ दिवसांच्या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

Yavatmal News: शेतकर्!यांना थकबाकी वसुलीचा ‘शॉक’; महावितरण करणार कारवाई; ९५ कोटी रुपयांची वीजबिल थकले

Mohol Bribery Case: ३३ हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी रंगेहाथ जेरबंद; मोहोळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ, अवैध मुरूम उपसा अन्..

Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे

SCROLL FOR NEXT