2corona_agencies_1.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना बळीची शंभरी! 'या' गावांमध्ये नवे 194 पॉझिटिव्ह अन्‌ पाच जणांचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 902 व्यक्‍तींच्या अहवालात 194 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या साडेतीन हजारांहून अधिक, तर मृतांची संख्या 103 झाली आहे. 

अक्‍कलकोटमधील माणिक पेठ, मैदंर्गी, चपळगाव, काझीकणबस, शावळ, सुलेरजवळगे, तडवळ येथे नऊ रुग्ण सापडले. दक्षिण सोलापुरातील बिर्ला सिमेंट कंपनी, दर्गनहळ्ळी, कंदलगाव, कारकल, मुस्ती, सादेपूर, वळसंग येथे 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, फोंडशिरस, लवंग, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, माळखांबी, मांडवे, संग्राम नगर, सवतगाव, वेळापूर, विझोरी, यशवंत नगर या ठिकाणी 33 रुग्ण सापडले. तर पंढरपुरातील भाईभाई चौक, संत पेठ, फुलचिंचोली, सिध्दीविनायक सोसायटी येथे चार रुग्ण सापडले. माढ्यातील कुर्डे गल्ली, भोसरे, पापनस, रांझणी, रिधोरे येथे दहा रुग्ण, तर सांगोल्यातील महादेव गल्ली, कोळा, महूद, निझामपूर येथे 13 रुग्ण आढळले. करमाळ्यातील आंबेडकर चौक, दत्त पेठ, कानड गल्ली, कसाब गल्ली, खडकपुरा, मेन रोड, मौलाली माळ, राशिन पेठ, सावंत गल्ली, सुतार गल्ली, जातेगाव, जेऊर, शेलगाव (क) येथे 30 रुग्ण सापडले. उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, डोणगाव, राळेरास येथे 12 आणि मोहोळ तालुक्‍यातील कामती बु., खंडाळी, पापरी, वाघोलीवाडी येथे पाच रुग्णांची भर पडली. बार्शीतील आडवा रस्ता, आशा टॉकीज, भवानी पेठ, भिम नगर, चोरमले प्लॉट, लहुजी चौक, म्हाडा कॉलनी, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, नळे प्लॉट, जुना मार्केट यार्ड, रामभाऊ पवार, रोडगा रस्ता, सोलापूर रोड, सुभाष नगर, वानी प्लॉट, झाडबुके मैदान, आगळगाव आणि सासुरे याठिकाणी 57 रुग्ण आढळले आहेत. 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये झाल्या 26 हजार 795 व्यक्‍तींच्या कोरोना टेस्ट 
  • ग्रामीणमधील कोरोना रुग्णांची संख्या झाली तीन हजार 653 रुग्ण 
  • पंढरपुरातील डोंबे गल्ली, भंडीशेगाव, वैराग, मंद्रूप, अक्‍कलकोटमधील शावळ येथील रुग्णांचा मृत्यू 
  • बार्शीची रुग्णसंख्या 810, दक्षिण सोलापूर 575, पंढरपूर 506 तर अक्‍कलकोटमध्ये 474 रुग्ण 
  • आतापर्यंत दोन हजार 108 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 442 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files उघड! फोटो सोडा... १८ अन् १९ सेकंदाचा व्हिडिओ देखील व्हायरल, बेडरूम, स्नानगृह अन् रहस्यमय खोली...

Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघात

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT