Hunger time on vendors in rural areas as the week market is closed 
सोलापूर

आठवडा बाजारअभावी कारागिरांची वस्तू विकण्यासाठी ससेहोलपट

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : आठवडा बाजार बंद असल्याने खेडेगावातील कारागीर व बलुतेदारांवर भटकंतीची वेळ आली आहे. बाजाराअभावी अपेक्षित विक्री होत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. 
आजही ग्रामीण भागात अनेक कारागीर व बलुतेदार शेती व जनावरांसाठी आवश्‍यक वस्तू घरी बनवतात. नंतर आठवडा बाजारात त्या वस्तू विकून उपजीविका करतात. त्यांचे कुटूंब यासाठी कष्ट करते. बहुतांश कारागिरांना शेती किंवा जगण्यासाठी अन्य उदरनिर्वाहाचे साधन नाही. कुटुंबाची उपजीविका याच व्यवसायावर अवलंबून असते. 
त्यांनी तयार केलेल्या सर्व वस्तू त्यांच्या गावात विकल्या जात नाहीत. त्यामुळे कुटुंबप्रमुख जवळच्या दोन-तीन मोठ्या गावातील आठवडा बाजारात बसून त्या वस्तू विकतात. सध्या लॉकडाउनने आठवडा बाजार बंद आहे. त्यामुळे कारागीर व बलुतेदार कुटुंबांना वस्तू विकण्यासाठी दररोज नवीन गावात फिरावे लागत आहे. सध्या एस. टी. किंवा खासगी वाहतुकीची साधने वेळेत उपलब्ध होत नाहीत. सर्व वस्तू डोक्‍यावर घेऊन चालतच भटकंती करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. कोरोना फैलावात असल्याने काही गावात कारागिरांना एका ठिकाणी बसून किंवा फिरून विक्री करू देत नाहीत. सध्या छोट्या कारागीर व बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बिटरगाव येथील ज्ञानेश्‍वर मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांना जनावरांसाठी आवश्‍यक असलेले दोर, कासरे, कान्या, मोहरकी, वेसन आम्ही घरात तयार करतो. अनेक वर्षांपासून त्या वस्तू आठवडा बाजारात विकण्याचे काम करतो. सध्या आठवडा बाजार बंद असल्याने गावोगावी फिरून विकण्याची वेळ आली आहे. आठवडा बाजारात पंचक्रोशीतील शेतकरी येत असल्याने विक्री चांगली होते. परंतु, आता तीन गावांत फिरूनही अपेक्षित विक्री होत नाही. त्यामुळे आमच्यासारख्या कारागिरांवर व बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT