Prashant Sale sakal
सोलापूर

Bhose News : 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 30 वर्षे प्रतीक्षा; तालुकाध्यक्षांच्या पुढाकाराने काम लागले मार्गी

3 किलोमीटरचा रस्त्यासाठी 30 वर्षे प्रतीक्षा करूनही मार्गी न लागल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या पुढाकाराने या भागातील लोकांना सोबत घेऊन स्वत खर्च करत मार्गी लावला.

गुरूदेव स्वामी

भोसे - मंगळवेढा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील हुन्नूर ते भोसे या सीमेवरील चौगुले वस्तीवर 3 किलोमीटरचा रस्त्यासाठी 30 वर्षे प्रतीक्षा करूनही मार्गी न लागल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या पुढाकाराने या भागातील लोकांना सोबत घेऊन स्वत खर्च करत मार्गी लावला.

हुन्नूर-भोसे रस्त्यावरील चौगुले वस्ती पासून ते हुन्नूर हे 3 किलोमीटर अंतर असून या परिसरामध्ये 70 कुटुंबे या ठिकाणी राहत असून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी कसलाच रस्ता नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.

अनेक वर्ष मागणी करून देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने या भागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला. मात्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी या भागातील शेतकऱ्यांना एकत्र बसून स्वखर्चाने हा रस्ता बनवून देण्याची तयारी दर्शवत तातडीने जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्याने गेली तीस वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चौगुले वस्ती परिसरातील 300 ग्रामस्थांचे व भोसे परिसरात शेतकऱ्यांची रस्त्यामुळे मोठी सोय होणार आहे.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्याबरोबर पुंडलिक साळे, बिराप्पा पुजारी, संतोष शिरसागर, अरुण इंगोले, उत्तम चोपडे, अन्नसो खडतरे, बन्सीलाल खडतरे, आप्पासो निकम, कुमार चौगुले, संतोष चौगुले, श्रीमंत चौगुले, महादेव पाटील, बंडू खडतरे, गणेश खडतरे, मनोहर निकम, सचिन निकम, महेश खडतरेड, विलास खडतरे, प्रवीण चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली 30 वर्षे झाले आमचा गावात जाणाऱ्या रस्त्यासाठी संघर्ष सुरू होता प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन मिळत होते परंतु प्रत्यक्षात रस्ता होत नव्हता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न स्वखर्चाने मार्गी लावल्याने चौगुले वस्ती वरील विध्यार्थी व ग्रामस्थाची सोय झाली.

- कुमार चौगुले ग्रामस्थ हुन्नूर

सीमावर्ती भागातील दोन गावाला जोडणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय माझ्या कानावर आल्यानंतर त्यासाठी मी पुढाकार घेऊन त्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांना ये-जा करण्याचा मार्ग सोयीस्कर झाला.

- प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT