Husband also died within two hours after the death of his wife three in the same village within ten hours 
सोलापूर

पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासात पतीचाही मृत्यू; दहा तासात एकाच गावातील तिघांचे निधन 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : मृत्यू कोणालाही चुकला नाही, नव्हे ते चुकवताही येत नाही. अशाच तीन मृत्यूच्या घटना अडीच हजार लोकसंख्या असलेल्या मुंगशी (वा) (ता. बार्शी) येथे घडल्या. केवळ दहा तासात तिघांचा मृत्यू झाला. गोरख बनसोडे, भागिरथी पवार व निवृत्ती पवार असे निधन झालेल्या जेष्ठांची नावे आहेत. यामध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासात पतीचाही मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. 
मंगळवारी रात्री गोरख सखाराम बनसोडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात्य पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर पहाटेच्या सुमारास गावातीलच भागिरथी निवृत्ती पवार यांचे वृद्धापकाने निधन झाले. त्या 96 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर केवळ दोन तासांनी त्यांचे पती निवृत्ती पवार यांचीही प्राणज्योत मालवली. ते 108 वर्षांचे होते. एकाच वेळी पती-पत्नी यांचे निधन झाल्याने सर्वत्र शोक निर्माण झाला. या दोघांवर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात तीन जेष्ठ व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT