shatpavli.jpg 
सोलापूर

पती-पत्नीस महागात पडली शतपावली 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : वैराग ( ता. बार्शी) येथे पती - पत्नीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करणे महागात पडले. रस्त्याच्या कडेने पुढे चाललेल्या एकाला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही घटना वैराग-माढा रोडवर तुळशिदास जाधव प्रशालेजवळ घडली. यात बार्शी पंचायत समितीचे लेखाधिकारी बाबासाहेब सुभाष माने (वय 37) रा. शिवाजीनगर, वैराग ता. बार्शी हे गंभीर जखमी झाले आहेत. 
घटनेनंतर तीन दिवसांनंतर कारचालक फतरुद्दीन अलीम मिर्झा (रा. वैराग ता. बार्शी ) याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, बाबासाहेब सुभाष माने हे शिवाजीनगर-वैराग येथे रहिवाशी असून ते बार्शी पंचायत समितीत कनिष्ठ लेखा परिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह वैराग ते माढा जाणाऱ्या रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तुळशीदास जाधव प्रशालेपासून ते माघारी फिरले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका कारने ठोकर दिली. व कारचालक पुढे अंतरावर थांबून निघून गेला. यावेळी त्यांच्या पत्नीने आरडा -ओरड करीत कार वाहनाचा नंबर व रंग लक्षात ठेवला. तातडीने माने यांना बार्शीला उपचारासाठी हलवले. नातेवाईक व पोलिसांनी लाल रंगाची इंडिका कारचा शोध घेतला. यात एम.12 सीडी 9775 ने मागून जोरात धडक दिली. त्यामुळे ते रस्त्याच्या खाली जोराने आपटले. गंभीर जखमी होऊन ते जागीच बेशुद्ध पडले. या अपघातात त्यांचा उजव्या हाताचा अंगठा फॅक्‍चर झाला. डोक्‍यास, कपाळास, हाता-पायास मार लागला आहे. अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदत न पुरविता पळून गेलल्या फतरुद्दीन अलिम मिर्झा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे तपास अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत आळणे हे करीत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT