husband leave wife for not bringing money from her house love affair crime sakal
सोलापूर

Solapur Crime : पैसे न आणल्याने पत्नीला सोडून पलायन; प्रेयसीसोबत राहात असल्याचा पाठवला मेसेज; गुन्हा दाखल

पत्नीने माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने एकाने तिला सोडून मुंबई गाठली.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : पत्नीने माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने एकाने तिला सोडून मुंबई गाठली. तसेच तो प्रेयसीसोबत राहत असून आता परतणार नसल्याचा मेसेज त्याने पाठवला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रमण सातप्पा साबळे (रा.लक्ष्मी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अपर्णा रमण साबळे (वय ३६, रा. कोनापुरे चाळ, फॉरेस्ट बुद्ध विहारशेजारी, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे. २००८ मध्ये अपर्णा हिचा रमण याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर रमण तिला सतत शिवीगाळ, मारहाण करत होता.

तसेच माहेरहून पाच लाख रुपये आण, अन्यथा माझ्याशी बोलू नको, असे तो म्हणाला होता. ११ एप्रिल रोजी त्याने मुंबईला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो घरी न परतल्याने त्याच्या आईने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

त्याने अपर्णा हिच्या नातेवाइकांना मेसेज केला. आई, भाऊ, बहीण, पत्नी व मुलीसोबत राहायचे नाही. माझी सोय केली आहे. माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्यासोबत राहत आहे. मी सोलापुरला परत येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनसवडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT