Satish Kadam sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील निजामशाहीत ५२ नव्हे तर ५८ गावे

सोलापूर जिल्ह्यात निजामशाहीच्या काळातील ५८ गावांचा हैदराबाद मुक्ती संग्रामासंदर्भात मोठा इतिहास उलगडा होत आहे.

दयानंद कुंभार

वडाळा - सोलापूर जिल्ह्यात निजामशाहीच्या काळातील ५८ गावांचा हैदराबाद मुक्ती संग्रामासंदर्भात मोठा इतिहास उलगडा होत आहे. आज हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अभ्यासक प्रा. सतीश कदम यांनी आपल्या सखोल संशोधन व अभ्यासातून नवनवीन पैलू उलगडले आहेत. निजामशाहीच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील ५२ नव्हे तर तब्बल ५८ गावे असल्याचा उल्लेख आढळला आहे.

२३ जानेवारी १९५० सेक्शन २०९० ए/बी नुसार भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारताचे गव्हर्नर जनरल राजगोपालचारी, हैदराबादचे तत्कालीन राजप्रमुख मीर उस्मान अली खान (निजाम सातवा) यांच्या श्वेतपत्रिकेनुसार मद्रास, मुंबई, हैदराबाद इलाका होता. या अंतर्गत तत्कालीन प्रशासकीय रचना करताना गावांची आदलाबदल करण्यात आली होती, अशी माहिती महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. सतीश कदम यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील १४, उत्तर सोलापूर १३, बार्शी १२, मोहोळ १७ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावाचा समावेश यामध्ये आढळला आहे. तर गरलाचीवाडी नावाच्या गावाचे अस्तित्व उलगडणे अद्याप कायम आहे.

अशी झाली अदलाबदल

निजामशाहीच्या काळात बार्शी तालुक्यातील सात गावे व उत्तर तालुक्यातील ११, करमाळा तालुक्यातील एक गाव अशी एकूण १९ गावे सोलापूरहून धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याला देण्यात आल्याचा उल्लेख आढळला आहे. तर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याला ५८ गावे देण्यात आली.

नेमक्या जहागिरीबाबत उलगडा नाही

सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांपैकी शेंद्री (बार्शी), कारंबा (उत्तर सोलापूर), चिखली (मोहोळ) या गावांत निजामशाही काळात जहागिरी असल्याचा उल्लेख आढळला आहे. पण नेमकी कोणाची जहागिरी होती याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.

निजामशाहीत सोलापूर जिल्ह्यातील हीच ती ५८ गावे

उत्तर सोलापूर तालुक्यातील - भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, शिवणी, नान्नज, मोहितेवाडी, गरलाचीवाडी या गावांचा उलगडा अद्याप झालेला नाही.

बार्शी तालुक्यातील - शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव, भोंजे, शेंद्री, वांगरवाडी, इरले, रऊळगाव, मुंगशी, सासुरे, तावरवाडी, बोरगाव.

माढा तालुक्यातील - अंजनगाव, जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरा, बुद्रूकवाडी, पंचपूलवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई तसेच सुलतानपूरच्या गावचा दोन ठिकाणी उल्लेख आढळतो.

मोहोळ तालुक्यातील - आष्टा, पोफळी, विरवडे (खु), चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, बाबरवाडी, वाळूज, देगाव, घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे, मसलेचौधरी.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील - वरळेगाव

विशेष म्हणजे कुलदैवत भैरवनाथाचे सोनारी हे गाव पूर्वी करमाळा तालुक्यात होते. नंतर हे गाव परंडा तालुक्यात समाविष्ट करण्यात आली आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामावर ‘असे झुंजलो आम्ही’ हे पुस्तक लिहीत असताना विविध ग्रंथ संदर्भातून तसेच जुन्या संदर्भानुसार सोलापूर जिल्ह्यातील ५२ नव्हे तर ५८ गावे निजामशाहीत होती, हे सिद्ध होत आहे. या ५८ गावांपैकी काही स्पेलिंग व शब्द उच्चारणानुसार काही गावांच्या नावात बदल संभवतो.

- प्रा. सतीश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT