सोलापूर

"मला होमक्वारंटाईन करण्यामागे राजकीय षडयंत्र' 

सुनील राऊत

नातेपुते (जि. सोलापूर) ः मला होमक्वारंटाईन करायला लावण्यामागे मागे राजकीय षडयंत्र आहे. जाणीवपूर्वक पूर्वग्रहदूषित केलेली ही कारवाई आहे, असा आरोप सध्या होमक्वारंटाईन असलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी केला आहे. 

माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना होमक्वारंटाईन करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस किरण साठे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. 
त्यांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरसचे माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आमदार सातपुते यांना होमक्वारंटाईन करण्याचे लेखी आदेश काढले होते. 

याविषयी आमदार राम सातपुते यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ""मी कायदा मानणारा व पाळणारा कार्यकर्ता आहे. माझे प्रशासनास पूर्ण सहकार्य आहे. पत्र मिळाल्यापासून मी स्वतः होमक्वारंटाईन झालो आहे. मात्र, मला होमक्वारंटाईन करायला लावण्यामागे मागे राजकीय षडयंत्र आहे. जाणीवपूर्वक पूर्वग्रहदूषित केलेली ही कारवाई आहे, याची मला खात्री आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकारणी लोकांचे बाहुले होऊ नये. माझा होमक्वारंटाईन कालावधी झाल्यानंतर सर्व नियम पाळून मी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी हजर होणार आहे. मी स्वतःला जनतेचा कार्यकर्ता समजतो.''  महाराष्ट्र

काम करणारा आमदार नको म्हणून तक्रार
याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते के. के. पाटील म्हणाले, ""आमदार राम सातपुते हे क्रियाशील आमदार आहेत. तालुक्‍यातील अनेकांना काम करणारा आमदार नको आहे. म्हणून अशी तक्रार झाला असावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT