अनंत राऊत sakal
सोलापूर

सोलापूर : धार्मिक ऐक्याचा मंगळवेढ्याचा आदर्श घेण्यासारखा; अनंत राऊत

हिंदू-मुस्लीम ऐक्यातून साजरा करण्यात येणाऱ्या गैबी पीर उरुसानिमित्त नामवंत कवींचे कविसंमेलन

हुकुम मुलाणी

मंगळवेढा : आजच्या समाजात राजकारण्यानी,धर्म पंडितांनी लावलेला महत्त्वाचा शोध म्हणजे धर्मांधता, धर्माला धर्म आणि जातीला जात घासली की ठिणग्या पडतात आणि मानवता जळून खाक होते आणि त्या मानवतेच्या अग्नीवर पाहिजे तशी पोळी भाजण्यासाठी राजकारणी मोकळा होतो.म्हणून माणवतेचा हा गळा दाबला जाऊ नये असे वाटत असेल तर महाराष्ट्राने,देशाने मंगळवेढ्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे मत कवी अनंत राऊत (पुणे) यांनी व्यक्त केले.

हिंदू-मुस्लीम ऐक्यातून साजरा करण्यात येणाऱ्या गैबी पीर उरुसानिमित्त नामवंत कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये ते बोलत होते यावेळी कवि तालीब सोलापूरी,सुंदर मालेगावी,मुजावर मालेगावी, इंद्रजीत घुले शिवाजी सातपुते आदी सहभागी झाले होते.या कवी संमेलनाचे उद्घाटक पक्षनेते अजित जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उरूस कमिटीचे प्रशांत गायकवाड, प्रवीण भोसले,सोमनाथ बुरजे,हजरत काजी,बाबुभाई मकानदार,जावेद मुजावर,गौस मुजावर,बाळदादा नागणे,विष्णू जगतात आदी उपस्थित होते.यावेळी कवी अनंत राऊत यांनी कवी हे फाटलेले लक्तरे शिवण्याचे काम करत असतो, कवितेमधून जगाला शाईच्या पेनातून केवळ झरणे नाही,खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही,लिहिताना चराचराचा विचार करतो शब्दाला रक्ताचे अमृत पाजत बसतो माझे मरण अटळ कविता मरणे नाही अशा शब्दातून कवी समाजप्रबोधनाचे काम कशा पद्धतीने करतो.

सोलापूरची तालीब सोलापूरी यांनी सध्याच्या काळात सासू आणि सुना मधून जो काही विसंवाद झाला परंतु सासूच्या मृत्यू नंतर सुनेला सासू विषयी असलेला कळवळा रडून कसा करते हे त्यांनी कवितेतून सादर केले. पती-पत्नी मधील संवादावर हिंदी व मराठी तून मार्मिक टिपण केले कवी इंद्रजित घुले यांनी देखील सध्याच्या बदलेल्या काळातील घटनेवर सूत्रसंचालनातून भाष्य करत डोळ्याला दिसणारे रंग खरे नसतात, जीवनाला दिसणारे रंग खरे असतात,जगात काय जरी झाले तरी मंगळवेढ्यात काही होत नाही.कारण इथल्या माणसाच्या अंतःकरणाचा रंग एक आहे अवघा रंग ऊरूसात एक झाला तेच इथले चित्र आहे.हेच इथल्या माणसाच्या जगण्यात दिसून येते.शिवाजी सातपुते यांनी आपल्या खुमासदार शैलीत पैशात क्या उधळपट्टीवर पैसा गेला पण नादच केला ही कविता सादर केले सुंदर मालेगावी व मुजावर मालेगावी यांनी कवितेमधून धार्मिक ऐक्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT