khadde parking.jpg
khadde parking.jpg 
सोलापूर

आता अडचणी सोसल्या तर उद्याच्या स्मार्ट सिटीने उजळेल शहराचे भविष्य

अनुराग सुतकर

सोलापूर : स्मार्ट सिटीची कामे स्मार्ट पध्दतीनेच व्हावीत. त्यासाठी सुरु झालेल्या कामांचा त्रास झाला तरी तो सहन करून पुढील काळात शहराला मिळणारे स्मार्ट रुप महत्वाचे ठरणार आहे असा सूर व्यापाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे. 
सोलापूर स्मार्ट सिटी ची कामांमुळे संपूर्ण शहर आज खड्डेमय झाले आहे. याचा सर्वात जास्त त्रास नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही होत आहे. हार्ट ऑफ सिटी अशी ओळख असणाऱ्या नवी पेठ परिसरात तर ठिकठिकाणी रस्त्याची, इलेक्‍ट्रिकल तारांची कामे चालू आहेत. त्याचा थेट परिणाम हा व्यापाऱ्यांवर होत आहे. आधीच कोरोणामुळे गेल्या वर्षभर आर्थिक फटका बसला असतानाच त्यात आणखी भर म्हणून ऐन दुकानाच्या समोर खड्डे खणून ड्रेनेज पाईपलाईन आणि पाणी पाईप लाईन दुरुस्तीचे काम चालू झाले आहेत. परंतु नवी पेठ मधला व्यापारी वर्ग बहुतांशी प्रमाणात समाधानी असल्याचेही निदर्शनास येत आहे. येथील व्यापाऱ्यांच्या अनुसार स्मार्ट चालू आहेत ती सगळी नव्या नव्या कामगारांच्या मार्फत चालू आहेत. त्यामुळे नेमकं कुठे ड्रेनेज लाईन चोक अप होत आहे याची माहिती नसल्यामुळे सर्व रस्ता हा खोदला जातो आहे. 
त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी एकच मागणी केली आहे की पार्किंगचा प्रश्न तर सुटलाच पाहिजे त्याच बरोबर महापालिकेतील जुने कर्मचारी यांना स्मार्ट सिटी च्या कामात सामावून घेतलं पाहिजे. तरच कामाचा दर्जा वाढेल आणि स्मार्ट सिटीची कामे स्मार्ट पद्धतीने होतील. अनुभव आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे नवी पेठ परिसर हा पुन्हा एकदा स्मार्ट रूप धारण करेल . त्यासाठी आम्ही व्यापारीवर्ग नेहमी सहकार्याची भावना जोपासली आहे. कारण त्याचा फायदा हा भविष्यात आम्हाला होणार आहे हे देखील माहित आहे. 

पार्किंगची सुविधा असावी 
आधी नोटाबंदी जीएसटी कोरोना आणि आता स्मार्ट सिटी या सर्व गोष्टींमुळे व्यापार ठप्प झाला आहे. त्यात ही स्मार्ट सिटी ची कामे त्यामुळे गिऱ्हाईक पाठ करताना दिसत आहे. एकाही व्यापाऱ्यांना न हटवता स्मार्ट सिटी मध्ये नवी पेठ येथे पार्किंगची सुविधा व्हावी आमची आग्रही मागणी आहे 
- योगेश पवार, छावा संघटना, नवी पेठ 

रोड मोठा झाल्याने सर्व प्रश्‍न सुटतील 
इथे इतके धुळीचे साम्राज्य पसरले आहे की, दररोज दुकाने साफ करूनच वैतागलो आहे. परंतू काही काळ गेला की रोड मोठा होईल आणि ट्राफिकची समस्या ही सुटेल" 
- कुशाल शाह संचालक, तुलसी 

चांगले काम होण्याची आशा 
माझा गिफ्ट सेंटरचा व्यवसाय आहे. मुळात कोरोनामध्ये लग्न समारंभ हे फार मोजक्‍याच लोकांमध्ये झाले. त्यामुळे लोक गिफ्टच घ्यायला येत नाहीत. परंतु आता स्मार्ट सिटी ची एक आशा आहे की चांगलं काम होईल. 
- सागर राजेश नागणकेरी, श्री स्वामी समर्थ गिफ्ट 

स्मार्ट सिटीची उत्स्तुकता 
आमच्या दुकानासमोर रेंगाळलेली कामे लवकरात लवकर झाले पाहिजे तरच आमच्या व्यवसायाला उभारी येऊ शकते. बाकी स्मार्ट सिटी ची उत्सुकता तर फारच आहे " 
- मनिष इंजामुरी, जयराज ड्रेसेस 

रस्ता मोठा व्हावा हे महत्वाचे 
आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की नवी पेठ परिसरातील मुख्य रस्ता हा मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही व्यापारीवर्ग सहकार्यासाठी कधीही तयार आहोत " 
- वैभव गंदमल, वैभव सुटिंग- शर्टिंग 

अडचणीपेक्षा भविष्याचा विचार मोठा 
स्मार्ट सोलापूर ची संकल्पना फार मोठी आहे, त्यामुळे आम्ही विचार ही मोठा ठेवला पाहिजे. बाकी उत्तम सुविधा असेल तरच ग्राहक खरेदी करतात ही गोष्ट प्रशासनाने पाहावी " 
ऋषि कुर्डे, बंडे फॅशन  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT