If you come to Pandharpur, you have to go to the MATH ... 
सोलापूर

पंढरपूरला आल्यास जावे लागेल मठात...

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर ः पंढरपूर शहरात दोन दिवसांपूर्वी दोन व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असल्यामुळे दक्षता म्हणून आता बाहेर गावाहून पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व लोकांना नगरपालिकेने यापुढे संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी 14 दिवस मठामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंढरपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना सातत्याने राबवल्या जात आहेत. तथापि दोन दिवसापूर्वी बाहेरून पंढरपूर शहरात आलेल्या दोन व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यामुळे पंढरपूर शहरात संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेने आता आणखी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

पंढरपूर पालिकेने बाहेरगावाहून पंढरपूर शहरात येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग वाढू नये यासाठी त्यांना मठां मधील विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरातील रहिवासी नसलेल्या नागरिकांनी पंढरपूर शहरामध्ये येण्याचे टाळावे तसेच त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांना शहरात येण्यास मनाई करावी व शहर कोरोना मुक्त ठेवण्यास मदत करावी असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे. 

मुख्याधिकारी श्री. मानोरकर म्हणाले, यापुढे ज्या व्यक्ती रेड झोन मधून पंढरपूर मध्ये दाखल होतील त्या सर्वांना सक्तीने 14 दिवस मठा मध्येच ठेवण्यात येणार आहे व त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहर व तालुक्‍यातील सहा व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या पैकी 47 जणांचे Swab घेण्यात आले आहेत. आज आणखी 39 जणांचे Swab घेण्यात येणार आहेत. कालच्या व्यक्तींच्या विषयीचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी प्राप्त होणार आहे. 

वाखरी येथील एमआयटी च्या covid-19 सेंटरमध्ये सध्या 59 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या लोकांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना दररोज आयुर्वेदिक वनस्पती पासून बनवलेला आयुष काढा दिला जात आहे. वैद्य आबासाहेब सोनवणे हे स्वखर्चाने हा काढा सर्व संबंधितांना देत असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर एकनाथ बोधले हे सर्वांचे सकारात्मक समुपदेशन करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन या वर्षी करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री फडणवीस

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT