karmala municipality  sakal
सोलापूर

तेरी भी चूप और मेरी भी चूप ;महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

सलग पाच सत्ताधारी-विरोधकांचा कारभार; महत्त्वाच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

अण्णा काळे

करमाळा : नागरिकांच्या दृष्टिने महत्वाचा असलेला करमाळा नगरपालिकेचा दवाखाना, जयप्रकाश नारायण नाट्यगृह, अंडरग्राऊड गटार, नगरपालिकेची इमारत आदी प्रश्नाबाबत पाच वर्षात सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. विरोधी पक्षानेही अपवाद वगळता महत्वाच्या विषयात लक्ष घातले नसल्याने ’तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असा पाच वर्षात नगरपालिकेचा कारभार झालेला आहे. स्वच्छतेबाबत नगरपालिकेला पुरस्कार मिळाला, ही बाब अभिमानाचीच पण तरीही शहर स्वच्छ का नाही? असा सर्वसामान्याचा प्रश्न आहे.

करमाळा नगरपालिकेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता आहे. त्यांचे चिरंजीव वैभव जगताप यांनी नगराध्यक्ष म्हणून सलग पाच वर्षे काम पाहिले आहे. निवडणूकीत जगताप व बागल हे एकत्र होते. मात्र निवडणूक होताच हे वेगळे झाले. शहर विकास आघाडी (सावंत- देवी) यांनाबरोबर घेऊन जगताप सत्तेत राहिले. तर जगतापाबरोबर एकत्र निवडणूक लढलेले बागल थेट विरोधी बाकावर बसले.

पाच वर्षात नगराध्यक्ष जगताप यांनी सत्ताधारी म्हणून विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र होत असलेल्या विकास कामाच्या गुणवत्तेबाबत अपवाद वगळता विरोधकांनी ’ब्र’शब्द उच्चारला नाही. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबात सामान्य नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केले. पण विरोधक म्हणून बागल गटाचे नगरसेवक यांनी पाहिजे तेवढा विरोध केला नाही. विरोधक म्हणून त्यांनी कधीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे अनेकदा सत्ताधारी व विरोधक यांच्यात नेमका कोणत्या प्रकारचे साटंलोटं आहे यांची ’काही टक्के‘ का होईना शहरवासीयांमध्ये कुजबुज आहेच. पाच वर्षात स्वच्छता, रस्ते या कामांसाठी विशेष निधी मंजूर करून घेण्यात सत्ताधारींना यश मिळाले. नगराध्यक्ष जगताप हे थेट मंत्रालयातून स्वत:चे वजन वापरून शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १६ कोटी एकाचवेळी मंजूर करून आणले, असा दावा करत आहेत. ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. यातून अनेक रस्ते केले आहेत. मात्र या रस्त्याच्या दर्जाबाबत विरोधकांनीही कधीच प्रश्न केला नाही. ही बाब शहरवासियांना खटकत आहे.

जगताप गटाचे प्रमुख नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीपाच वर्षाच्या कालावधीत दोन वर्ष कोरोना रोखण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. करमाळा नगरपालिका ’क’ वर्ग नगरपरिषद असताना देखील पाच वर्षाच्या सुमारे ५७ कोटी निधी शासन दरबारी राजकीय वजन वापरून शहरवासियांसाठी खेचून आणला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत तर केंद्र सरकारच्या ’स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात क वर्ग नगरपरिषदेत प्रथम क्रमांक मिळवून तब्बल पाच कोटींचे बक्षीस मिळवले असून नगरपरिषदेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सन्मान आहे.

- वैभव जगताप, माजी नगराध्यक्ष, करमाळा

करमाळा नगरपालिकेचा कारभार हा नगरपालिकेच्या इमारतीतून न चालता वाचनालयात चालतो. यासारखे दुर्दैव दुसरे कुठले नाही. नगरपालिकेच्या ताब्यातील जयप्रकाश नारायण टाऊन हॉल असेल व इतर सार्वजनिक मालमत्ता असतील त्याचा शहरवासियांसाठी कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. याचा उपयोग व्हावा म्हणून पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

- शौकत नालबंद, गट नेते, बागलगट

दखलपात्र ठळक कामे

  • शहरातील रस्ते डांबरीकरण करणे - १२ कोटी

  • काँक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे - १३ कोटी

  • समाजमंदिर, धर्मशाळा, भाजीमंडई विकसित करणे - सव्वापाच कोटी शौचालय बांधकाम करणे - २ कोटी ८९ लाख

  • नाला ट्रेचिंग करणे - २ कोटी ९० लाख

  • स्मशानभूमी विकसित करणे - १ कोटी १२ लाख

  • गटार बांधकाम करणे - ४ कोटी

  • उद्यान, पुतळे परिसर सुशोभिकरण, पाईपलाईन, एलईडी दिवे बसवणे - ३ कोटी २० लाख

दुर्लक्षित ठळक कामे

  • नगरपरिषदेचा दवाखाना, जयप्रकाश नारायण नाट्यगृह बंद

  • नगरपरिषदे नगरपरिषदेच्या इमारतीला गळती

  • नगरपरिषदेचा कारभार ज्ञानेश्वर वाचनालयातून सुरू

  • मच्छी मार्केट व मटन मार्केट बांधकाम होऊनही सुरु नाही

  • भूयारी गटार योजना नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT