Corona Vaccine Dose Sakal media
सोलापूर

तीर्थक्षेत्र अन्‌ पंचायत समिती, तहसील कार्यालयाबाहेर लसीकरण केंद्रे

एकही डोस न घेतलेले, दुसरा किंवा संरक्षित (बुस्टर) डोस न घेतलेल्यांचे लसीकरण लवकर व्हावे आणि ते कोरोनापासून सुरक्षित राहावे म्हणून आता तिर्थक्षेत्राबाहेर व जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये, पंचायत समित्या व मोठ्या महाविद्यालयांमध्येही नवीन लसीकरण केंद्रे सुरु केले जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील १४ लाख (शहरातील चार लाख तर ग्रामीणमधील १० लाख) व्यक्तींनी लस टोचणे अपेक्षित आहे. त्यात एकही डोस न घेतलेले, दुसरा किंवा संरक्षित (बुस्टर) डोस न घेतलेल्यांचे लसीकरण लवकर व्हावे आणि ते कोरोनापासून सुरक्षित राहावे म्हणून आता तिर्थक्षेत्राबाहेर व जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये, पंचायत समित्या व मोठ्या महाविद्यालयांमध्येही नवीन लसीकरण केंद्रे सुरु केले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्राबाहेर लसीकरण केंद्रे सुरु होणार असून त्याठिकाणी बुस्टरसह सर्वच डोसची व्यवस्था असणार आहे.

जिल्ह्यातील १२ वर्षांवरील जवळपास ३४ लाख व्यक्तींना कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित आहे. पण, अजूनही साडेचार ते पाच लाख व्यक्तींनी एकही डोस घेतलेला नाही. तर दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतरही अनेकांनी संरक्षित डोस घेतलेला नाही. १२ ते १७ वयोगटातील विद्यार्थी लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येकाला सोयीचे होईल, अशा ठिकाणी केंद्रे सुरु केल्यास १०० टक्के लसीकरण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १४ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रे सुरु आहेत. तरीपण, लसीकरणाचा वेग कमीच असल्याने आता तालुक्याच्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयाबाहेर व मोठ्या तीर्थक्षेत्राबाहेर केंद्रे सुरु करून लसीकरण वाढविण्याचे नियोजन केल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली.

जिल्ह्यात दीड लाख डोस

जिल्ह्यातील १४ लाख व्यक्तींना अजूनही लस टोचण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्या ९० हजार कोविशिल्ड, ४० हजार कोवॅक्सिन व ३० हजार कोर्बोवॅक्स लसीचा साठा शिल्लक आहे. आता दररोज दीड ते तीन हजारांपर्यंतच लसीकरण होत असून हा वेग वाढवून पुढील ७५ दिवसांत लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे पावणेतीनशे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी (ता. १६) शहरात १३ तर ग्रामीणमध्ये ४२ रुग्ण वाढले आहेत. आता शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ९२ तर ग्रामीणमध्ये १८२ सक्रिय रुग्ण असून त्यात १५६ पुरुष आणि ११८ महिला रुग्णांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ६३ तर माढा तालुक्यात ५१ आणि मोहोळ तालुक्यात १२ रुग्ण आहेत. उर्वरित तालुक्यातील रुग्णसंख्या दहापेक्षा कमी आहे. दिलासादायक बाब म्हणजे माळशिरस, उत्तर सोलापूर, सांगोला व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शहरी भागात एकही रुग्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT