An important decision was taken by the District Collector regarding the sale of liquor in Solapur district 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील मद्य विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री 31 मेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 
लॉकडाउनचा कालावधी वाढत असताना राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ मद्य विक्री सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्याच्या आकडेवारीत सोलापूर जिल्ह्यात मद्य विक्री सुरू असल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. यासंदर्भात काही समज, गैरसमज व संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा स्पष्ट आदेश 19 मे रोजी काढला असून जिल्ह्यातील मद्यविक्री 31 मेपर्यंत बंदच ठेवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बहुतांशी भाग हा प्रतिबंधित क्षेत्र आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा फारसा प्रसार झाला नसल्याने ग्रामीण भागातील किरकोळ मद्यविक्री सुरू होईल, अशी आशा तळीरामांमध्ये निर्माण झाली होती. ही आशा आता मावळली असून किमान 31 मेपर्यंत तळीरामांना संयम ठेवावा लागणार आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतलेल्या आदेशाची प्रत जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, बिअर शॉपी, परमिट रूम, बियर बार, देशी दारूचे किरकोळ विक्रेते यांना पाठविण्यात आला आहे. तसेच पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना देखील या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT