crime sakal
सोलापूर

Akkalkot Crime News : अक्कलकोटमध्ये युवकास कोयत्याने मारहाण ; युवक गंभीर जखमी

तुला लई मस्ती आली आहे का?, राम मंदिर प्रतिष्ठापना जोरात करतो का?, असे म्हणून युवकास लोखंडी कोयत्याने, रॉडने, काठीने, सोडा बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार (ता. ३१) रात्री सात वाजता येथील समर्थ चौकांत घडली.

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : तुला लई मस्ती आली आहे का?, राम मंदिर प्रतिष्ठापना जोरात करतो का?, असे म्हणून युवकास लोखंडी कोयत्याने, रॉडने, काठीने, सोडा बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार (ता. ३१) रात्री सात वाजता येथील समर्थ चौकांत घडली. फिर्यादी युवकावर गंभीर हल्ला केल्याप्रकरणी सुमारे दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद सोमशंकर भुअगप्पा किवडे, (वय २८, अक्कलकोट) यांनी दिली आहे. हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समीर जमादार, मुज्जु टिनवाला, तक्कु घोळसगांवकर, टिनवालाचा भाऊ (नाव माहिती नाही), समीर शेख, जावेद फुलारी, रियाज बागवान, मुस्तकी मुजावर व इतर तीन ते चार लोक (सर्व रा. अक्कलकोट) अशी आहेत.

३० जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्कलकोट येथील समर्थ चौकात डेअरीसमोर थांबला असताना संशयित आरोपी समीर जमादार, मुज्जू टिनवाला (दोघे रा. मुजावर गल्ली, अक्कलकोट) यांनी फिर्यादी सोमशंकर भुअगप्पा किवडे यास ३० लिटर दुधाची ऑर्डर आहे, असे सांगून मुजावर गल्ली कमानीजवळ प्रवीण कटारे यांच्या घरासमोर घेऊन गेले.

त्यानंतर समीर जमादार, मुज्जू टिनवाला, तक्कू घोळसगावकर, टिनवालाचा भाऊ (नाव माहिती नाही), समीर शेख, जावेद फुलारी, रियाज बागवान, मुस्तकी मुजावर (सर्व रा. अक्कलकोट) व इतर तीन ते चार लोकांनी गैरकायद्याचा जमाव जमवून फिर्यादीस गंभीर मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. समाजात रोष निर्माण झाल्याने पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार व पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे हे स्वतः परिस्थिती हाताळत आहेत. याप्रकरणी फिर्यादीने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT