बिबट्या Sakal
सोलापूर

भंडीशेगाव येथे बिबट्यासदृश प्राण्याची दहशत! जर्सी गाईचा पाडला फडशा

भंडीशेगाव येथे बिबट्यासदृश प्राण्याची दहशत! जर्सी गाईचा पाडला फडशा

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव येथे नितीन चव्हाण या शेतकऱ्याच्या जर्सी गाईवर बिबट्यासदृश वन्यप्राण्यांने हल्ला केला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील (Pandharpur) Taluka) भंडीशेगाव (Bhandishegaon) येथे नितीन चव्हाण या शेतकऱ्याच्या जर्सी गाईवर बिबट्यासदृश (Leopard) वन्यप्राण्यांने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये जर्सी गाईचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास भंडीशेगाव परिसरातील चव्हाण मळा परिसरात घडली आहे. बिबट्या आल्याच्या भीतीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्यासदृश प्राणी असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका वाहनावर देखील बिबट्याने हल्ला केल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबतची माहिती पंढरपूर वन विभागाला देण्यात आली आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांच्या ठशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

दरम्यान, आज पहाटे नितीन चव्हाण या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या जर्सी गाईवर बिबट्यासदृश वन्य प्राण्याने अचानक हल्ला केला. यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चेने दहशत पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT