पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या! Canva
सोलापूर

पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या!

पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या!

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर येथील एसटी आगारातील दशरथ गिड्डे (वय 42) या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज (बुधवार) पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) येथील एसटी (ST Depot) आगारातील दशरथ खंडू गिड्डे (Dashrath Gidde) (वय 42) या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज (बुधवार) पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात सहाय्यक मेकॅनिक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

मूळचे मोहोळ येथील असलेले दशरथ गिड्डे हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT