Crime News esakal
सोलापूर

फेसबुकवरुन ओळख केली अन्‌ दोन दिवसांत आठ हजार घेऊन गेली

तात्या लांडगे

तरुणीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर: मोबाइल व व्हॉट्‌स अ‍ॅपवरून व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग तयार केले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीने फसवणूक केल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलिसांत दाखल झाली आहे. त्यावरुन अनिता शर्मा नावाच्या तरुणीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती.

सोशल मीडियाचा वापर करून अनिताने सोलापुरातील 45 वर्षीय व्यक्‍तीला फेसबुकवर फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली. एका दिवसाच्या बोलण्यानंतर त्या तरुणीने विश्‍वास संपादन केला. तिने स्वत:चा मोबाइल क्रमांक फेसबुकच्या माध्यमातून त्या व्यक्‍तीला दिला. त्यानेही तिला आपला स्वत:चा मोबाइल क्रमांक देऊन टाकला. दोघांनाही दोन दिवसांची ओळख जुनी वाटू लागली. त्यांनी मेसेजच्या माध्यमातून खूप वेळ घालविला. एका दिवसाच्या बोलण्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही व्हॉट्‌सअपवर बोलू लागले. त्या तरूणीने विश्‍वास संपादन करून तिला जसे हवे तसे त्या व्यक्‍तीला करायला लावले. त्यानेही व्हॉट्‌सअपवरील व्हिडिओ कॉलवरून ती म्हणते तसे सर्वकाही केले. मात्र, त्या व्यक्‍तीला अनिता त्याचे सगळे कारनामे रेकॉर्डिंग करीत असल्याचे जाणवू दिले नाही.

तरुणीने काही तासांनी त्या तरुणाकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने सावध पवित्रा घेतला, परंतु व्हॉट्‌सअप व्हिडिओ कॉलवरील सर्वकाही रेकॉर्डिंग तिच्याकडे होते. पैसे दे, नाहीतर संपूर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. त्याच्या भितीने त्या व्यक्‍तीने सर्वप्रथम आठ हजार रुपये अनिता शर्माला ऑनलाइच्या माध्यमातून देऊन टाकले. त्यानंतर तिने पुन्हा 15 हजारांची मागणी केली. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने दोन दिवसांच्या मैत्रीची संपूर्ण हकीकत जोडभावी पेठ पोलिसांसमोर कथन केली. फिर्यादीचे नाव न छापण्याच्या अटीवर तपास अधिकाऱ्याने माहिती दिली.

'हनी ट्रॅप'चा प्रकार

फेसबुकवरील मेसेंजर अनलॉक असल्यास कोणीही कोणाला सहजपणे मेसेज करु शकतो. त्यातूनच अनिता शर्मा नावाच्या फेसबुक अकाउंटवरून त्या व्यक्‍तीला एक मेसेज आला. त्या व्यक्‍तीने तिला प्रतिसाद दिला आणि पुढे त्यांची ओळख मैत्रीत बदलली. मात्र, हनी ट्रॅपचा अंदाज नसलेल्या त्या तरूणाला ही मैत्री महागात पडली. फिर्यादी हा वाळू, खडी, डस्ट विक्रीसंदर्भातील कमिशन एजंट असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक करणकोट हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT