आमदार प्रणितींच्या गैरहजेरीत "कॉंग्रेस मनामनात...' नव्हे, फक्त कॉंग्रेस भवनात
आमदार प्रणितींच्या गैरहजेरीत "कॉंग्रेस मनामनात...' नव्हे, फक्त कॉंग्रेस भवनात Canva
सोलापूर

'कॉंग्रेस मनामनात अन्‌ घराघरात', पण आमदार प्रणितींच्या गैरहजेरीत...

तात्या लांडगे

कॉंग्रेसने 'कॉंग्रेस मनामनात अन्‌ घराघरात' हे अभियान हाती घेतले. उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत त्याची सुरवात झाली.

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणायचेच, या हेतूने शिवसेनेने (Shivsena) "शिवसंपर्क' अभियान राबविले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) "संवाद यात्रे'ला सुरवात केली. दुसरीकडे, कॉंग्रेसने (Congress) "कॉंग्रेस मनामनात अन्‌ घराघरात' हे अभियान हाती घेतले. उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या उपस्थितीत त्याची सुरवात झाली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत गर्दी होणार नसल्याने गणेशोत्सवाचे कारण पुढे करून ते अभियान सध्या कॉंग्रेस भवनातच (Congress Bhavan) सुरू असल्याची चर्चा आहे.

मोदी लाटेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करून महापालिकेचा गड भाजपने काबीज केला. बरीच वर्षे विरोधी पक्षात बसलेल्या भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना एक-दोन दिवसांआड पाणी देऊ, स्मार्ट सिटीतून शहराचा विकास करू अशी विविध आश्‍वासने दिली. मात्र, ना समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न मार्गी लागला ना शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळाले. सध्या शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. कोणताही नवा उद्योग सुरू व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपने प्रयत्न केला नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेने सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे.

भाजपचे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने त्यांचे अभियान सुरू केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली. कॉंग्रेसच्या अभियानातून संघटनात्मक बांधणी मजबूत होऊन अनेकजण कॉंग्रेसच्या गळाला लागतील, असा विश्‍वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला. परंतु, आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे राज्याचे कार्याध्यक्षपद असल्याने त्यांना सातत्याने राज्यभर दौरे करावे लागत आहेत. दुसरीकडे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही शहरात फिरणे बंद केल्याचे चित्र आहे. नूतन जिल्हाध्यक्ष माळशिरसचे असून ग्रामीणमधील 11 तालुक्‍यात फिरताना त्यांनाही शहरात लक्ष घालणे अशक्‍य आहे. शहराध्यक्ष वाले यांच्यासोबत अनेकांचे जमत नसल्याने आमदार प्रणिती शिंदे आल्यानंतरच काही आजी-माजी पदाधिकारी कॉंग्रेस भवनमध्ये फिरतात, असेही बोलले जात आहे. या सर्व बाबींमुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पश्‍चात कॉंग्रेसचे अभियान गुंडाळून ठेवावे लागल्याची चर्चा विरोधकांमध्ये सुरू आहे.

कॉंग्रेस घराघरात, पण पदाधिकाऱ्यांच्या मनात काय?

कॉंग्रेसचे नगरसेवक प्रिया माने, श्रीदेवी फुलारे यांच्यासह काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराज असल्याने त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरविली आहे. मागील महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्यांनी आता या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडी झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेले बहुतेक इच्छुक दुसऱ्या पक्षात जाण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे अशांच्या मनात खरोखरच कॉंग्रेस आहे का, याचाही अभ्यास पदाधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. दरम्यान, कॉंग्रेस स्वबळावर लढण्यास तयार असून इच्छुकांची यादीही तयार असल्याचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे त्या यादीत आपले नाव असेल का, या चिंतेतून काहींनी विविध पक्षातील नेत्यांशी संपर्क ठेवल्याचेही बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT