डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील Sakal
सोलापूर

'येत्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस देईल हिंमतवान तरुणांनाच संधी!'

'येत्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस देईल हिंमतवान तरुणांनाच संधी!' डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील

उमेश महाजन

जिल्ह्यातील तरुण कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बदलासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

महूद (सोलापूर) : खांद्यावर पक्षाचा झेंडा व छातीवर पक्षाचे चिन्ह मिरवून जनहिताची कामे करणाऱ्या कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या हिंमतवान तरुण कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकांमध्ये संधी देण्यात येणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील तरुण कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बदलासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील (Dr. Dhawalsingh Mohite- Patil) यांनी सांगोला (Sangola) येथील कार्यकर्ता संपर्क मेळाव्यात बोलताना केले.

जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. मोहिते-पाटील व कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासून कॉंग्रेस पक्षाचे जनसंपर्क अभियान सुरू होते. याची सांगता सांगोला येथील कविराज मंगल कार्यालयात कार्यकर्ता संपर्क मेळाव्याने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रांतिक सदस्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, रामहरी रूपनवर, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, तालुका अध्यक्ष सुनील भोरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव कांबळे, रवींद्र कांबळे, शहराध्यक्ष तोहित मुल्ला, नगरपालिका महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा खडतरे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा मैना बनसोडे, शहर आघाडीच्या अध्यक्षा स्वाती अंकलगी आदी उपस्थित होते.

डॉ. मोहिते-पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या अनेक भागात हक्काचा लोकप्रतिनिधी नसूनही पक्षावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा एकनिष्ठ लोकांबरोबर काम करताना आनंद वाटत आहे. आज बोलणाऱ्याचे काही पण विकले जात आहे, हे केंद्रातील सरकारकडे पाहून लक्षात येते, असेही ते म्हणाले.

माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या हिताचा वसा घेऊन दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली आहे. माझ्या मनात येते तेच तुम्ही ऐका, अशी ही "मन की बात' सुरू आहे. या देशात शेतकऱ्यांवर हल्ला करणारे, त्यांना चिरडून मारणारे मोकाट फिरत आहेत. देशातील कायद्याची स्थिती नाजूक झाली असून, देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. प्रतापसिंह मोहिते- पाटील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यात कॉंग्रेसला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. तोच इतिहास पुन्हा घडत असून, त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कॉंग्रेस मजबूत होईल, असेही रूपनवर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT