X MLA रमेश कदम  Sakal
सोलापूर

रमेश कदम कोणत्या गटात जाणार? मोहोळ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट; सप्टेंबरमध्ये मतदारसंघातील गावांना भेटी

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील माजी आमदार रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर रविवारी सुटका झाली. त्यांचे लक्ष मोहोळ विधानसभा मतदारसंघावरच असून आठ-पंधरा दिवसात दौरा करणार असल्याचे त्यांनी तुरुंगातून बाहेरच येताच स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील माजी आमदार रमेश कदम यांची तब्बल आठ वर्षांनंतर रविवारी (ता. २०) सुटका झाली. त्यांचे लक्ष अद्याप मोहोळ विधानसभा मतदारसंघावरच असून आपण आठ-पंधरा दिवसात दौरा करणार असल्याचे त्यांनी तुरुंगातून बाहेरच येताच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून त्याठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. पक्षाने दिलेला उमेदवार विजयी करण्यात त्यांची मोठी निर्णायक भूमिका राहिली आहे. रमेश कदम यांनाही त्यांच्या मदतीमुळेच यश मिळाले होते. काही महिन्यांनी कदमांनी स्वत:चे कार्यकर्ते निर्माण करून जम बसवायला सुरवात केली होती.

मात्र, आठ महिन्यातच महामंडळाच्या गैरव्यवहारात ते तुरूंगात गेले आणि पुढील निवडणुकीत इंदापूरचे यशवंत माने यांना त्याठिकाणी लॉटरी लागली. आमदार माने यांना पुढील निवडणुकीत याच मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे आहेत. माजी आमदार राजन पाटील, अजिंक्यराणा पाटील व विक्रांत पाटील यांनीही अजित पवारांनाच पसंती दिली आहे. उमेश पाटील देखील अजित पवारांसोबतच आहेत.

दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक, विजयराज डोंगरे, नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर हे देखील महायुतीसोबतच आहेत. त्यामुळे आता रमेश कदम हे अजित पवार की शरद पवार, यापैकी कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शरद पवार गटासोबत जाण्याचीच शक्यता

मोहोळ मतदारसंघात निवडून आल्यावर आठ महिन्यातच माजी आमदार रमेश कदम यांनी विकासात्मक कामे केली. तरुणांचे संघटन मजबूत केले. पण, वर्षपूर्ती होण्यापूर्वीच त्यांना तुरूंगात जावे लागले. सध्या राजकीय स्थिती बदलली असून शिवसेना, राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून कदमांना उमेदवारी मिळणे कठीण आहे. राजकीय समीकरणे बदलल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार सध्या नाही.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे काही स्थानिक नेते राजन पाटलांसोबत राष्ट्रवादीच्या त्यांच्या गटाच्या उमेदवाराचा प्रचार करतील, हेही अनिश्चित आहे. या पार्श्वभूमीवर रमेश कदम हे शरद पवार गटासोबतच जातील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT