Incentive allowance given to employees by Bhagaiwadi Grampanchayat in Solapur district 
सोलापूर

'या' ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना दिला एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रशासकीय अधिकारीसह पोलिस, डाँक्टर, नर्सेस यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कर्मचारी देखील जबाबदारीने काम करीत आहेत. भागाईवाडी (ता. उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीचे कर्मचारी या कालावधीत मोलाचे काम करीत असुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये भत्याचे धनादेश देण्यात आल्याचे सरपंच कविता घोडके पाटील यांनी सांगितले.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना विषाणुला हरवण्यासाठी शासन, प्रशासन यांचे शर्थीचे प्रयत्न असुन यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्सेस, संलग्नित यंत्रणा हे अहोरात्र काम करीत आहेत.तर ग्रामीण भागात गावातील कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असुन ते देखील शासन,प्रशासन,आरोग्य, संरक्षण विभागाचे सुचनेनुसार काम करीत आहेत. कोरोना संदर्भात जनजागृती, परगाववरुन आलेल्या लोकांची नोंदणी,निरंजंतुकीकरण औषध फवारणी, कुंटुबाचे सर्वेक्षण, स्वच्छता,पाणीपुरवठा आदि कामे पोलिस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी जबाबदारीने करीत आहेत.त्यांची ही सेवा कर्तव्य असले तरी  गावासाठी कौतुकास्पद आहे.भागाईवाडी-शेरेवाडी गावात याकामी हातभार लावणारे आशा सेविका स्वाती घोडके,अंगणवाडी सेविका संगीता घोडके, पोलीस पाटील सजित पाटील, कर्मचारी समाधान चौधरी,महादेव घोडके या कर्मचार्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये धनादेश तंटामुक्त अध्यक्ष बब्रुवाहन घोडके, कृषी मित्र लहु घोडके, सजित पाटील यांचे हस्ते देण्यात आले. आमच्या कामाची दखल घेतली तर वेळोवेळी काय अडचण, आवश्यकता याची  विचारपुस सरपंच व पदाधिकारी करतात हेच आमचे सर्वस्वी समाधान आणि प्रोत्साहन असल्याची भावना यावेळी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

White Squirrel Kolhapur : नेहमीची खार विसरा, ही आहे खास! कोल्हापुरात आढळली चक्क पांढरी शुभ्र खारुताई; काय आहे यामागचं रहस्य?

IPL 2026: बंगळूर संघाविरुद्ध सुमार गोलंदाजीचा फटका; सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची निराशा

Latest Marathi News Live Update : मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुट्टीवर

आजचे राशिभविष्य - 30 मार्च 2026

Prashant Padole Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले

SCROLL FOR NEXT