Thief 
सोलापूर

हाती लागेल त्याची चोरी ! एमआयडीसी परिसरातून चोरट्याने पळविले पलंग, ताट, ग्लास 

तात्या लांडगे

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू नितीन नगरातील मुकेश हरिशचंद्र जमादार (रा. न्यू महात्मा फुले नगर, सिद्धार्थ चौक) यांच्या घरातून चोरट्याने 15 हजार 500 रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. त्यामध्ये लोखंडी पत्रे, लोखंडी कपाट, लोखंडी पलंग, लाईट मीटर, स्टीलचे ताट व ग्लास अशा वस्तू व भांड्यांचा समावेश आहे. या प्रकरणी जमादार यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस नाईक श्री. ताकभाते या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

बेशिस्त वाहनचालकांना साडेआठ लाखांचा दंड 
शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या हेतूने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी नागरिकांनी विनामास्क फिरू नये, वाहनचालकांनी विनाकारण वाहन घेऊन शहरात फिरू नये, असे आवाहन केले. तरीही रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 17 ऑगस्ट ते 7 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिसांनी त्यांच्याकडून आठ लाख 51 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

शेतात दगड टाकल्याने हाणामारी 
तू माझ्या शेतात दगड का टाकला, म्हणून विचारायला गेल्यानंतर तानाजी आप्पा लादे व अन्य तिघांनी मारहाण केल्याची घटना सोहाळे (ता. मोहोळ) येथे घडली. मारहाणीत लाथाबुक्‍क्‍याने व दगडाने मारहाण केल्याने अनिता अशोक लादे, अशोक अप्पा लादे यांना उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू 
सलगर वस्ती पोलिस ठाण्याअंतर्गत परिसरातील एका विहिरीत साहिल सलीम विजापुरे (वय 15, रा. डोणगाव रोड) याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सिद्राम गायकवाड यांनी साहिलला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच साहिलचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT