wahun gela photo.jpg 
सोलापूर

ओढ्यात मासे धरण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची घटना 

गुरुदेव स्वामी

भोसे (सोलापूर)ः तालुक्‍यातील ममदाबाद हु. वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यात मासे धरण्यासाठी गेल्या तिघापैकी प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे 20 वर्षीय उच्चशिक्षित अभियंता तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना तालुक्‍यातील महमदाबाद हु येथे आज सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. पाण्यात वाहून जाण्याची या पंधरवड्यातील तालुक्‍यातील दुसरी घटना आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महमदाबाद परिसरात असणारे सिमेंट बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. अशा परिस्थितीत काल गेल्या दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू भरून वाहू लागले आहेत. अशा वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी तिघे जण गेले होते. पण वेगात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल इंगोले हा युवक वाहून गेला. शंकर शिरसागर याने इतर दोघांना वाचवले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळच्या वेळी अंधारात शोध कार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे रेस्क्‍यू पथकाला पाचारण केले. हुन्नुर ते ममदाबाद हु रस्त्यावर असणाऱ्या या पुलावरील संरक्षक कठड्याच्या वरून पाणी जात असल्यामुळे या पुलावरून सध्या वाहतूक करणे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत या भागातील नागरिक धोकादायक वाहतूक करीत आहेत. सध्या या पुलावर संरक्षक कठडे बसण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT