Income earned from milk business and organic farming gopalan engineering education solapur  sakal
सोलापूर

अभियांत्रिकी शिक्षण घेऊन दूध व्यवसाय अन्‌ सेंद्रिय शेतीतून मिळविले उत्पन्न

प्रदीप राठोड यांनी गोपालनातून साधली प्रगती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुणे- मुंबईतील नोकरीचे आकर्षण बाजूला ठेवत हन्नूर (ता. द.सोलापूर) येथील प्रदीप राठोड यांनी गाईच्या संगोपनातून सेंद्रिय शेती व दूध विक्रीतून स्वावंलबी अर्थकारण उभे केले आहे. प्रदीप राठोड हे कुलकर्णी तांडा येथील अभियंता आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुण्यात नोकरी देखील मिळाली. नंतर कोरोनात नोकरी सोडून गावी स्वतःचा व्यवसाय उभारावा म्हणून त्यांनी काम सुरू केले.

पूर्वी त्यांच्या घरात म्हशीच्या दुधाचा व्यवसाय होता, पण तो नंतर मोडला. त्यांनी काही जाणत्या लोकांशी सल्ला मसलत केली, तेव्हा त्यांनी गाईच्या दुधाची उपयुक्तता समजून घेतली. गाईच्या शेणाचा उपयोग शेतीसाठी करता येईल हे त्यांच्या लक्षात आले. गाईच्या दुधाला सोलापूर शहरात चांगला भाव मिळतो, हे लक्षात घेत त्यांनी एक गाय सुरवातीला घेतली. नंतर दोन गीर गायी त्यांनी घेतल्या. गाईच्या दुधाची विक्री त्यांनी सुरू केली. शहरात गीर गायीच्या दुधाला ६५ रुपये प्रतिलिटर भाव मिळू लागला. म्हशीच्या दुधाच्या तुलनेत हा भाव चांगला होता. त्यांनी जुळे सोलापुरात गाईच्या दुधाचे वरवे सुरु केले. तसेच तुपाची निर्मिती सुरु केली.

त्यानंतर त्यांनी गाईच्या शेण व मुत्राची स्लरी करुन त्याचा उपयोग द्राक्ष बागेसाठी सुरु केला. पहिल्यांदाच त्यांनी स्लरीचे खत दर पंधरवड्याला द्राक्ष बागेसाठी देण्यास सुरवात केली. द्राक्षाच्या वाढीवर त्यांचे चांगले परिणाम उमटले आहेत. तसेच सेंद्रिय पध्दतीने द्राक्षाचे पीक घेण्याचा त्यांचा हा प्रयोगदेखील यशस्वी होण्याच्या वाटेवर आहे.

ठळक बाबी

  • अभियांत्रिकी शिक्षण घेऊन दूध व्यवसायात

  • दूध उत्पादन व सेंद्रिय शेतीचे उत्पादन

  • गीर गायीचा जादा दूध उत्पादनासाठी उपयोग

नोकरीपेक्षा स्वतःच्या शेतात योग्य पध्दतीने काम केल्यास स्वावलंबी जीवन जगता येते हा अनुभव मला आला. तसेच चांगले उत्पादनदेखील मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात गायीची संख्या वाढविण्याचा विचार आहे.

- प्रदीप राठोड, कुलकर्णी तांडा, हत्तूर, ता. द.सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

SCROLL FOR NEXT