सोलापूर

अत्यवस्थ स्थितीत रुग्ण येत असल्याने मृतांच्या संख्‍येत वाढ

प्रमोद बोडके

 सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला यासारखा त्रास आहे अशा व्यक्तीने तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 

बुधवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत सोलापूर शहरात कोरोनाबाधितचे एकूण तीनशे आठ रुग्ण आढळले असून कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 84 जण कोरोना मुक्त झाले असून 203 जणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या एकवीस व्यक्तींमधील अनेक व्यक्ती या शेवटच्या क्षणी उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे ही समोर आले होते. नागरिकांना जर सर्दी, ताप, व श्वसन यंत्रणे संदर्भात कोणताही त्रास होत असेल तर त्यांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सोलापूर शहरात करण्यात आलेल्या प्रतिबंध क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय आजपासून प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरिकांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी झेप; अवघ्या एका दिवसात तब्बल ३.७८ टक्क्यांनी वाढ

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT