MLA Samadhan Avtade Sakal
सोलापूर

18 च्या पुढील वयोगटासाठी अनुरक्षण गृहाची संख्या वाढवणार

कोरोनाच्या भीषण परिस्थिती मुळे अनाथ बालकांची संख्या वाढली असून, 18 वर्षापर्यंत संगोपन शासनाकडून केले जाते.

हुकूम मुलाणी

कोरोनाच्या भीषण परिस्थिती मुळे अनाथ बालकांची संख्या वाढली असून, 18 वर्षापर्यंत संगोपन शासनाकडून केले जाते.

मंगळवेढा - राज्यातील कोरोनामुळे अनाथ बालकांची (Orphan Child) संख्या वाढल्यामुळे त्यांच्यासाठी 18 च्या पुढील वयोगटासाठी असलेल्या मुलासाठी अनुरक्षण गृहाची संख्या वाढवण्याबाबतचा शासनाचा (Government) विचार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सांगितले. याबाबतचा प्रश्न आ. समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade) यांनी उपस्थित केला होता.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज सकाळच्या प्रश्नोत्तरे सत्रामध्ये आ.आवताडे यांनी कोरोनाच्या भीषण परिस्थिती मुळे अनाथ बालकांची संख्या वाढली असून, 18 वर्षापर्यंत संगोपन शासनाकडून केले जाते. अठरा वर्षांनंतर देखील काहीना नोकरीच्या संधी किंवा त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी अडचणी येत राहतात. त्यामुळे त्या मुलाची जबाबदारी शासन घेणार आहे का? या अनुषंगाने हा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यास उत्तर देताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सध्या 18 वर्षापर्यंतच्या मुलाची काळजी घेतली जाते. त्याची त्यासाठी अनुरक्षण गृहांची संख्या देखील वाढवणार असल्याचे सांगून अनुरक्षण गृहाच्या माध्यमातून 18 ते 21 व 21ते 24 वयोगटातील मुला-मुलींना बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न असल्याचे महिला बाल कल्याण मंत्री ठाकूर आ. आवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT