Increase yield reducing cost of chemical fertilizers agriculture through cow rearing Farmers santosh aarkhile solapur esakal
सोलापूर

सोलापूर : लागवड खर्च कमी व उत्पादन अधिक

पांगरेच्या संतोष आरखिले यांचा गोशेतीचा प्रयोग यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गाईच्या पालनातून शेतीचा रासायनिक खतांचा खर्च कमी करत उत्पन्नात वाढ मिळवण्याची कामगिरी पांगरे (ता.करमाळा) येथील शेतकरी संतोष आरखिले यांनी केली आहे. संतोष आरखिले यांची शेती पांगरे (ता. करमाळा) येथे आहे. त्यांनी या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला होता. वर्षाकाठी शेतीच्या उत्पादनासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च केवळ खते व फवारणीपोटी होत असे. अर्थातच जादा उत्पादन होऊन देखील या खर्चामुळे प्रत्यक्षात फायदा कमीच व्हायचा ही अडचण होती. तेव्हा त्यांनी गोपालक परमेश्वर तळेकर यांच्या सल्ल्याने एक गाय घेतली.

गायीच्या शेणखत व गोमुत्राचा उपयोग करुन त्यांनी जीवामृत, गोकृपामृत अशी शेतीसाठी लागणारी औषधी करण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये शेणखताचा वापर होऊ लागला. त्यासोबत गाईची संख्या आठपर्यंत वाढली. गाईंची संख्या वाढल्याने पाच एकर बागायतीला पुरेल इतके खत गाईपासून मिळू लागले. मागील दोन वर्षात त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केला. त्यामुळे वर्षाकाठी रासायनिक खतांचा दीड ते दोन लाखांचा खर्च कमी झाला. ते शेतात गहू, केळी अशी पिके घेतात. शेणखतामुळे जमिनीचा कस चांगला राहतो. रासायनिक खर्चाचा जो खर्च वाचला तो एका अर्थाने उत्पन्नातील वाढ आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एखादे वेळी उत्पादन कमी झाले तरी वाचलेला खर्च फायद्यात धरला जाऊ लागला.

पण प्रत्यक्षात शेणखतामुळे पिके सकस व भरपूर प्रमाणात येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढच झाली. या शिवाय घरातील कुटुंबीयांना व वृध्दांना गाईचे दूधदूभते अधिक उपयोगी ठरले. आता गाईची संख्या वाढवून पूर्ण गोशेती करण्याचा त्यांचा मानस आहे.

ठळक बाबी

  • आठ गाईंचा सांभाळ

  • शेतातील रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे बंद

  • कुटुंबीयांना पुरेल एवढे दूधदूभते

  • शेतीसाठी लागणारी औषधीची शेतातच निर्मिती

शेतातील रासायनिक खतांचे खर्च पूर्ण बंद करून गाईच्या आधाराने सेंद्रिय शेती केली आहे. त्यामुळे रासायनिक खताच्या खर्चात बचत व उत्पानदनात वाढ असा दुहेरी लाभ झाला.

- संतोष आरखिले,पांगरे, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रयत्न, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

Chandrakant Khaire: मतचोरी रोखण्यासाठी बूथयंत्रणा सक्षम करा: चंद्रकांत खैरे; टेंभुर्णीत शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक

SCROLL FOR NEXT