3rto_driving_license 
सोलापूर

वाहन परवान्याची वाढली मागणी ! वाहन परवान्यासाठी आता शनिवार, रविवारीही कॅम्प

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउननंतर तालुकास्तरावरुन वाहन परवान्यासाठी अर्ज वाढले आहेत. तत्पूर्वी, पंढरपूर, मोहोळ, बार्शी, अक्‍कलकोट याठिकाणी महिन्यातून दोन दिवस कॅम्प घेतले जात आहेत. तरीही वाहन परवान्यासाठी शेकडो शिकावू वाहनचालक प्रतीक्षेत राहत आहेत. त्यामुळे आता शनिवारी व रविवारीही कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी परिवहन आयुक्‍तांकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे उपप्रादेशिक अधिकारी संजय डोळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ठळक बाबी...

  • पंढरपूर, बार्शीला वाहन परवान्यासाठी शनिवारी, रविवारीही कॅम्प घेण्याचे नियोजन 
  • महिन्यातील एका आठवड्यात दोन दिवसांऐवजी आता चार दिवस कॅम्प घेतला जाईल
  • परिवहन आयुक्‍तांकडे परवानगीची मागणी; मान्यता मिळताच होईल अंमलबजावणी
  • महिन्यात तालुकास्तरावरील कॅम्पमधून दिले जातात 150 वाहन परवाने
  • लॉकडाउननंतर तालुकास्तरावरुन वाहन परवान्यासाठी वाढली मागणी

मोहोळ, अक्‍कलकोट तालुक्‍यातील शिकाऊ वाहनचालक परवान्यासाठी सोलापुरातील आरटीओ कार्यालयात ये- जा करतात. मात्र, पंढरपूर व बार्शी तालुक्‍यातील वाहनचालकांना हे अंतर खूप दूर आहे. त्यामुळे या तालुक्‍यात शनिवार व रविवारी आगाऊ कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आरटीओ कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असून 18 सहायक मोटार वाहन निरीक्षक आता प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यातच कोरोनाची भिती कायम असल्याने परवान्याची संख्या वाढवून देण्याऐवजी दिवस वाढविण्यासंबंधी परिवहन आयुक्‍तांकडे मागणी केल्याचेही डोळे यांनी सांगितले.


एक डोळा अन्‌ कर्णबधीर चालकाला मिळाला वाहन परवाना 
केंद्र सरकार व परिवहन आयुक्‍तालयाच्या निर्णयानुसार एक डोळा निकामी झालेल्यांना व कर्णबधीर चालकांनाही वाहन परवाना दिला जात आहे. कर्णीबधीर चालकाला परवाना देताना त्याला श्रवण यंत्र लावल्यानंतर ऐकू येणे आवश्‍यक आहे. तर एक डोळा निकामी झालेल्यास 120 अंशात दिसायला हवे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. आतापर्यंत सोलापुरातील एका कर्णीबधीर चालकास निकषांनुसार परवाना दिला आहे. तर एक डोळा निकामी झालेल्या दोघांना परवाना वितरीत केल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT