increased voter turnout decisive 0 74 percent increase in Solapur and 0 65 percent in Madha lok sabha election 2024 Sakal
सोलापूर

Solapur News : वाढलेला मतदानाचा टक्का निर्णायक; सोलापुरात ०.७४ तर माढ्यात ०.६५ टक्के मतांची वाढ

मतदानात ज्या ज्या वेळी टक्का वाढतो, त्यातील बहुतांशी वेळी परिवर्तन घडत असल्याचे समोर येते.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मतदानात ज्या ज्या वेळी टक्का वाढतो, त्यातील बहुतांशी वेळी परिवर्तन घडत असल्याचे समोर येते. माढा व सोलापूर लोकसभा मतांचा टक्का किंचित वाढला आहे. वाढलेला टक्का परिवर्तन घडविणार की पुन्हा भाजपच्या उमेदवारांना विजयी करणार? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

माढ्यातील माण, फलटण, सांगोला, माळशिरसमध्ये वाढलेला मतांचा टक्का, सोलापुरातील शहर दक्षिण, शहर मध्य, शहर उत्तर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात वाढलेला मतांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.

उन्हाचा प्रचंड कडाका, मतदारयादीत असलेला घोळ यामुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने आज माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदान आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

त्यामध्ये २०१९ च्या तुलनेत सोलापुरात ०.७४ तर माढ्यात ०.६५ टक्के मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ५८.४५ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी (ता.७) लोकसभा निवडणूक २०२४ साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत ५९.१९ टक्के मतदान झाले आहे.

सोलापुरात २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये ०.७४ टक्के मतांची वाढ झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ६३.०० टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत माढ्यात ०.६५ टक्के मतांची वाढ झाली आहे.

मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्र परिसरात मंडप टाकून सावलीची व्यवस्था केली होती. प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पाणी, उष्णतेचा त्रास होऊन डिहायड्रेशन झाल्यास तत्काळ त्यांना ओआरएसचे पाणी मिळावे यासाठी त्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली होती.

सोलापूर महापालिका हद्दीतील मतदान केंद्रावर महापालिकेचे अतिरिक्त आयोग संदीप कारंजे व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्व पायाभूत सोयीसुविधांची जबाबदारी सांभाळली. मतदान जनजागृतीसाठीही जिल्हा प्रशानसाच्यावीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते.

माढा पुन्हा आघाडीवर

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्केवारीत माढा कायमच आघाडीवर राहिला आहे. माढ्यातील मतदार हा ग्रामीण भागातील तर सोलापूर मतदारसंघातील मतदार हा निम्मा ग्रामीण व निम्मा शहरी आहे. मतदानात ग्रामीण भाग अग्रेसर असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत दिसून आले आहे.

सोलापूर मतदारसंघात १९९१ मध्येच ६१.४८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २००२ मध्ये ५५.४२, २००९ मध्ये ४६.६२, २०१४ मध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सोलापूरचा टक्का ६० च्या जवळ आहे. माढ्यात मात्र कायमच चुरस असते. माढ्यात २०१४ मध्ये ६३.७१, २०१९ मध्ये ६३ टक्के तर २०२४ मध्ये ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. सोलापूरच्या तुलनेत माढा पुन्हा एकदा आघाडीवर राहिल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT