Prafull Kadam.jpg
Prafull Kadam.jpg 
सोलापूर

चार जिल्ह्यांसाठी हवे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ : किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, या चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठाची स्थापना करा, अशी मागणी किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे. 

यासाठी विद्यापीठ कृती समितीची स्थापना करून पश्‍चिम महाराष्ट्रा सोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार- खासदार व विविध संस्थांचा घेणार पाठिंबा घेण्यात येणार आहे. सुरुवातीला राज्य व केंद्रशासनाने मिळून किमान 500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा आग्रह असून 
रस्ते, रेल्वे,विमान, मध्यवर्ती स्थान व इतर पूरक व सोयीच्या बाबी लक्षात घेऊन माणदेशातील सांगोला, पंढरपूर, म्हसवड किंवा माळशिरस यापैकी एका ठिकाणी विद्यापीठ उभारण्याचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमीनीपैकी तब्बल 37.5% क्षेत्राचा म्हणजे 116.12 लाख हेक्‍टर एवढ्या प्रचंड मोठ्या जमीनीचा समावेश होतो. महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी हवामान विभागापैकी चार कृषी हवामान विभागात विद्यापीठाचे क्षेत्र व्यापले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे विद्यापीठ प्रचंड विस्तार आणि भौगोलिक सलगते अभावी आपल्या अधिपत्याखालील क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या चार जिल्ह्यासाठी एक स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली असून पश्‍चिम महाराष्ट्रा सोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांचाही जाहीर पाठिंबा या कृषी विद्यापीठ साठी घेण्यार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले आहे. 

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, या जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास नाशिक, नंदुरबार, धुळे ,जळगाव या जिल्ह्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे. कारण उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ असावे ही त्याची अनेक वर्षाची मागणी आहे. राज्यात आदिवासीचे सर्वाधिक वास्तव्य असणाऱ्या या जिल्ह्यात मानवी विकास निर्देशांक खाली आहे. त्याचबरोबर या भागात परंपरागत शेती करणारा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मोठ्या समूहाला नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून आधुनिक शेतीच्या प्रवाहात वेगाने आणता येईल असे मत प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले आहे. 

या कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती कार्यालय चारही जिल्ह्यातील लोकांच्या दृष्टीने सोयीचे व पूरक असणे गरजेचे आहे. यासाठी रस्ते, रेल्वे व विमान या तिन्हीही वाहतूक सेवांचा विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता पाहणेही महत्त्वाचे आहे. सर्व बाजूंनी विचार करता सद्यस्थितीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग; कोल्हापूर- नागपूर रेल्वे मार्ग; इंदापूर-जत राज्यमार्ग; सोलापूरला होत असणारे नवीन विमानतळ; प्रयोगशील शेतकरी या बाबींचा विचार करता सांगोला किंवा पंढरपूर (जि.सोलापूर) हे मध्यवर्ती तालुके सोयीचे व पूरक आहेत. त्याचबरोबर माळशिरस (जि.सोलापूर), फलटण (जि. सातारा) या तालुक्‍यात शेती महामंडळाच्या हजारो एकर जमिनी आहेत. याचाही उपयोग कृषी विद्यापीठासाठी करता येईल. सातारा- सोलापूर महामार्गावरील म्हसवड (जि. सातारा) या भागाचाही यासाठी विचार करता येईल. पायाभूत सुविधा, लोकांची सोय आणि देशभरातून व जगभरातून येणारे तज्ज्ञ व अभ्यासक या सर्व बाबींचा विचार करून प्रस्तावित कृषी विद्यापीठासाठी जागा निश्‍चित करता येईल, असेही मत प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले. 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT