liqer 
सोलापूर

सोलापुरातील घरपोच मद्य विक्रीची स्वतंत्र नोंदणी, "एमआरपी'मध्येच विक्री बंधनकारक 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) उद्यापासून (शनिवार) घरपोच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. घरपोच मद्य विक्रीची स्वतंत्र नोंदवही केली जाणार आहे. या शिवाय घरपोच मद्य विक्री केलेल्या परिमाणाची एक अतिरिक्त स्वतंत्र वही विक्रेत्यांना ठेवावी लागणार आहे. विक्रेत्यांनी एमआरपीनेच मद्य विक्री करावी ग्राहकांकडून कोणतेही वाढीव शुल्क घेऊ नये अशा स्पष्ट सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत. 

परवानाधारक ग्राहकांना व्हॉट्‌सऍप, मोबाईल एसएमएस, मोबाईल कॉल, दूरध्वनी या माध्यमातून मद्याची मागणी करता येणार आहे. मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्यांचा क्रमांक ठळकपणे दुकानाबाहेर लावावा लागणार आहे. घरपोच मद्य सेवेची व्यवस्था दुकानदारांनाच करावी लागणार आहे. वितरण व्यवस्थेसाठी दहा पेक्षा अधिक डिलिव्हरी बॉय ठेवता येणार नाहीत. या डिलिव्हरी बॉयला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने ओळखपत्र दिले जाणार आहे. घरपोच मद्य मिळाल्यानंतर ग्राहकांकडून मद्याची किंमत रोख स्वरूपात अथवा डेबिट/क्रेडिट कार्ड, स्वाईप मशिनच्या स्वरूपात डिलिव्हरी बॉय स्वीकारणार आहे. 
डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागणार आहे. डिलिव्हरी बॉयने मास्क, हेड कॅप, हॅन्डग्लोज वापरणे बंधनकारक आहे. 

नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्य विक्रीची दुकाने बंदच राहणार आहेत. दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एकावेळी दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत, सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर अनिवार्य, सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल या ग्राहकास सर्दी खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी दुकानात प्रवेश करू नये, दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही, परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे. दुकानदाराकडून/ग्राहकाकडून नियम भंग झाल्यास त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली जाईल अशा मजकुराचा फलक प्रत्येक दुकानासमोर लावण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT