laptop.jpg 
सोलापूर

लॅपटाॅप बाजाराला भाववाढीचा दणका व अपुरा पुरवठा

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः आंतरराष्ट्रीय व्यापारातील विस्कळीतपणामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये लॅपटॉपच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच मागणीच्या तुलनेत अत्यंत अपुरा पुरवठा होत असल्यामुळे लॅपटॉपमध्ये भाववाढीचा व्हायरस शिरला आहे. अशात वर्क फ्रॉम होम, अभ्यासासाठीही एकदम मागणी वाढल्याने भाववाढीचा फटका बसत आहे. 
कोरोनानंतर आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यापाराच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोप आणि इतर देशातील लॅपटॉप उत्पादक कंपन्यांनी चीनमध्ये लॅपटॉप हब करून आशियातील देशांना लॅपटॉपचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने धोरण ठेवले आहे. युरोपऐवजी चीनमधून जलमार्गाने कमी वाहतूक खर्चामध्ये भारताला लॅपटॉपचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे भारतामध्ये लॅपटॉपची निर्मिती अद्यापही होत नाही. त्यामुळे पूर्णपणे इतर देशातील लॅपटॉप निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या नव्या गोष्टी घडल्या. यामध्ये मुख्य म्हणजे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. मुंबई, पुण्यातून जे चाकरमाने लोक काही दिवसाची सुट्टी म्हणून गावी आले, ते कोरोनामुळे गावातच अडकले. ते गावी आले असताना वर्क फ्रॉम होमच्या सूचना मिळाल्या. त्यामुळे त्यांनी स्थानिक बाजारात लॅपटॉप खरेदीला प्राधान्य दिले. पूर्वी फक्त मेडिकल व अभियांत्रिकी या दोन पदवी शिक्षणासाठी लॅपटॉप घेतले जात असत. मात्र आता पहिली ते दहावीचे शिक्षण ऑनलाइन झाले. त्यासाठीदेखील लॅपटॉपची मागणी वाढली. नियमित बाजारपेठेची उलाढाल वगळता कोरोनामुळे वाढलेली ही जास्तीची मागणी आता नोंदवली गेली आहे. 
युएसमधील कंपन्यांनादेखील लॅपटॉपचा पुरवठा वाढवण्यासाठी काही करता आले नाही. सर्वच लॅपटॉप उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत हा पेचप्रसंग गंभीर बनला आहे. यासोबतच चीनची धोरणेही बऱ्यापैकी बदलली आहेत. लॅपटॉपसाठी लागणारा मदरबोर्ड, मेमरीज आणि इतर यंत्रसामग्री पाहता त्याचा बहुतांश कच्चामाल हा चीनमध्ये तयार होतो. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा नसल्यामुळे लॅपटॉपच्या किंमतीत तब्बल 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. स्पेअर पार्टच्या बाबतीत देखील हिच स्थिती झाली आहे. 
किंमती वाढल्या तरी ग्राहक त्यांची गरज म्हणून लॅपटॉप घेण्यास तयार आहेत. मात्र प्रत्यक्षात मागणीच्या तुलनेत लॅपटॉपचा पुरवठा 80 ते 90 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मागणी केल्यानंतर विक्रेत्यांना तो पुरवठा वेळेत करणे अडचणीचे झाले आहे. शंभर ते दोनशे लॅपटॉपची मागणी केली, तर वीस ते तीस लॅपटॉप कसेबसे मिळतात. त्यामुळे या बाजारपेठेला पुरवठा व भाववाढ या दोन्हीतही अडचण झाली आहे. 

नेमके काय घडले 
- वर्क फ्रॉम होम व ऑनलाइन शिक्षणामुळे लॅपटॉपच्या मागणीत वाढ 
- लॅपटॉप निर्मितीचे हब चीनमध्ये 
- भारतात लॅपटॉपची निर्मिती नाही 
- कच्चा मालाचे भाव वाढल्याने किंमतीत वाढ 
- आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळित झाल्याने पुरवठा कमी 
- लॅपटॉप किंमतीत तीस टक्‍क्‍यांनी वाढ 
 

कंपन्यांकडे लॅपटॉपची मागणी
लॅपटॉप बाजारात कधी नव्हे, अशी गंभीर स्थिती उद्‌भवली आहे. पूर्वी लॅपटॉप उत्पादक कंपन्या त्यांच्या विक्रेत्यांना लॅपटॉप विक्रीचे उद्दिष्ट देत असत. पण आता विक्रेत्यांना कंपन्यांकडे सातत्याने लॅपटॉपची मागणी करावी लागत आहे. 
-सुनील भांजे, अध्यक्ष, सोलापूूर कॉम्प्युटर डिलर असोसिएशन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT