MCP Andolan
MCP Andolan 
सोलापूर

सरकार देश विकू पाहतंय, सावधान ! माजी आमदार आडम; सीटूचे वीजबिल माफीसाठी अभिनव आंदोलन 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : जे गद्दार भांडवलदार, उद्योजक या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि देशाला बुडवून फरार झाले, अशा दिवाळखोरांना देशात आणून शिक्षा देण्याऐवजी त्यांच्यासारख्या भांडवलदारांचे साडेसात लाख कोटींची कर्जमाफी करून आरती देऊन ओवळत आहेत. मात्र गोरगरिबांचे फक्त लॉकडाउनच्या काळातील वीजबिल माफ करण्यास सरकार तयार नाही. लोकांना खोट्या स्वप्नांची खोटी दुनिया दाखवून सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाचा सपाटा चालवून देश विकायला निघाले, तेव्हा सावधान! अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्र सरकारवर केली. 

जुनी मिल कंपाउंड येथे बुधवारी (ता. 23) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) वतीने लॉकडाउनच्या काळातील सरसकट वीजमिल माफ करावे, ही मागणी घेऊन श्री. आडम यांच्या मार्गदर्शनाखाली तर महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. डोक्‍यावर "वीज बिल माफ करा' अशा घोषणांचे प्रतिकात्मक विजेचे बल्ब असणारे मुकूट घालून सरकारचे लक्षवेधी अभिनव धरणे आंदोलन करण्यात आले. 

या वेळी श्री. आडम पुढे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे विधेयक मांडले. यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल याबाबत एक चकार शब्द विधेयकात नाही. अत्यावश्‍यक सेवेतून शेतमाल वगळले असून एफसीएसचे खरे मालक अंबानी, अदानी, गोयल, गोयंका होतील. अन्नधान्याची बेबंद साठेबाजी होईल. लोक रास्त धान्यासाठी तडफडून मरतील, याचा पूर्ण अंदाज केंद्र सरकारला आहे. हा धोका परतवून लावण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करावे. 

या वेळी महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, सनी शेट्टी, बापू साबळे, आरिफ मणियार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT