inspiring story of army lieutenant saurabh pawar  Sakal
सोलापूर

Success Story : भटक्या समाजातील सौरभ पवार लष्करात लेफ्टनंट

कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच सैन्यात; कष्ट अन्‌ मेहनतीच्या जोरावर अधिकारीपदी मजल

सकाळ वृत्तसेवा

Natepute : नातेपुते येथील भटक्या विमुक्त समाजातील (नंदीवाले समाजातील) सौरभ नागनाथ पवार याची लष्करात लेफ्टनंट पदावर थेट निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

सौरभ पवार यांचे शिक्षण येथील अक्षय शिक्षण संस्थेत इयत्ता चौथीपर्यंत, दाते प्रशालेत इयत्ता सातवीपर्यंत आणि आठवी ते दहावी (वारणानगर) कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये शिक्षण झाले आहे.

वारणानगर येथे शिक्षण घेत असताना त्यास लष्करातील पदाची आवड निर्माण झाली. तो नववीपर्यंत शैक्षणिकदृष्ट्या हुशार नव्हता. परंतु इयत्ता दहावीत तेथील शिक्षकांनी त्यास चांगले घडविले तेथेच त्याला औरंगाबाद येथील एस. पी. आय कॉलेजची माहिती मिळाली. तेथे त्याने दहावीनंतर प्रवेश परीक्षा दिल्या आणि प्रवेश मिळाला. अकरावी, बारावी औरंगाबादला केल्यानंतर पुणे येथील एस. पी. कॉलेजमधून बीएससी (फिजिक्स) पदवी घेतली.

बीएससी झाल्यानंतर कोरोना काळातच रिलायन्स कंपनीच्या पेट्रोलियम विभागात प्रशासकीय विभागात विशाखापट्टणम येथे नोकरी लागली. विशाखापट्टणम येथे नोकरी करीत असतानाच त्याने लष्करातील आर्मीच्या कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस)च्या यूपीएससीमार्फत परीक्षा दिल्या.

सिलेक्शन बोर्डा म्हणजेच एसएसबीमधून त्याची निवड झाली. निवडीनंतर चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण होऊन गोरखा रायफलमध्ये लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली आहे. या संघर्षमय वाटचालीत त्याच्या आई, वडील तसेच पुणे येथील अनिस क्लासेसचे मोठे मार्गदर्शन लाभले आहे.

सौरभ पवार याच्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांपैकी कुणीही लष्करी सेवेत नाही. भटक्या विमुक्त समाजातील पहिल्या युवकाची इंडियन आर्मीमध्ये थेट लेफ्टनंटपदी निवड झाल्याने त्याचे नातेपुते व पंचक्रोशीत आणि नंदीवाले समाजात मोठे कौतुक होत आहे.

भटक्यांचे जीवन डोळ्यासमोर

सौरभ यांचे वडील नागनाथ हे पाचवी तर आई जयश्री यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचा एक मुलगी बीएस्सी अ‍ॅग्री, थोरला मुलगा एमएस्सी अ‍ॅग्री असून सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. भटक्यांच्या जीवन, दररोजचे जगणं अनुभव डोळ्यासमोर ठेवून मुला, मुलीना उच्च शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतल्याचे आई-वडिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Latest Marathi News Live Update : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा शरद पवारांना फोन

SCROLL FOR NEXT