Canva
Canva
सोलापूर

'उजनी'च्या ऊस पट्ट्यात आता पिकताहेत एक्‍स्पोर्ट क्वालिटीची फळे !

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत लक्ष घातल्यापासून या भागातही फळबागा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याचा (Karmala) उजनी (Ujani Dam) लाभक्षेत्र परिसर उसाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात उसाचे पीकच मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत लक्ष घातल्यापासून या भागातही फळबागा (Orchards) लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. परिसरात दरवर्षी फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे तालुक्‍यात वाशिंबे, कंदर, चिखलठाण, पारेवाडी परिसरात हा बदल दिसून येत आहे. उसापेक्षा फळबागांपासून उत्पन्नही चांगले मिळत असल्याने फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. (Instead of sugarcane in Ujani benefit area, farmers are now turning to orchards-ssd73)

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील तरुण शेतकरी वर्ग या बदलांना प्रथम सुरवात करीत आहे. परिसरात सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू ही पिके घेतली जात असून, आगामी काळात सीताफळ, चिकू, संत्रा ही पिकेही घेतली जाणार आहेत. फळबागांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेऊ लागले असून, यातून बळिराजाही समृद्ध होत आहे.

कृषी खात्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे असून, पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी फळबाग लागवडीकडे वळत आहेत व शेतीकडे उद्योग म्हणून पाहात आहेत.

फळबाग शेतीला उसाप्रमाणे जास्त पाणीही लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे संकटही टळत आहे. शेतकरी फळबागा लागवडीकडे वळत आहेत.

- सुयोग झोळ, युवा फळबाग शेतकरी, वाशिंबे

उजनी लाभक्षेत्रात ऊस पिकानंतर केळी लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात शासनाने राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे. शेतकऱ्यांना माती, पाणी, रासायनिक खते यांचे परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा सुरू करावी.

- संतोष खाटमोडे, केळी उत्पादक

जळगाव जिल्ह्यानंतर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण क्षेत्रात सर्वांत जास्त निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत आहे. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना स्वत:चा माल निर्यात करण्यासाठी व उजनी धरण परिसरात शीतगृह उभारणीसाठी बॅंकांमार्फत कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे.

- अभिजित पाटील, फळबाग शेतकरी, वाशिंबे

शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे विभागाकडून दिल्ली ते सांगोला किसान रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. किसान रेल शेतमालाच्या वेगवान वाहतुकीमध्ये खरंच गेमचेंजर ठरत आहे. करमाळा तालुक्‍यातील जेऊर स्टेशनवरून उजनी परिसरातील शेतमाल दील्ली बाजारपेठेत जात होता; परंतु रेल्वे विभागाने जेऊर रेल्वे स्टेशनवरचा थांबा रद्द केला आहे, तो पूर्ववत करावा.

- गणेश कसाब, शेतकरी, सोगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT