corona 
सोलापूर

सोलापुरात 1075 जणांच्या तपासणीत आढळले 40 नवे कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आता आटोक्‍यात आली आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत महापालिका हद्दीतील कोरोना चाचणीचे 1 हजार 75 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये फक्त 40 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 1 हजार 35 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

कोरोना मुक्त झालेल्या 59 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता सहा हजार 451 एवढी झाली आहे.

नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये जुळे सोलापुरातील वसंतनगर, उत्तर कासबा, न्यू पाच्छा पेठ, अभिमानश्री नगर, राघवेंद्र नगर, गुरूनानक नगर, केशव नगर पोलीस लाइन, उमा हौसिंग सोसायटी, मुक्तेश्वर हाउसिंग सोसायटी, सैफूल परिसरातील रत्नमंजरी नगर, बुधवार पेठ परिसरातील दोस्ताना चौक, पश्‍चिम मंगळवार पेठ परिसरातील बुधले गल्ली, उमानगरी, अशोक चौकातील अकांक्षा अर्पाटमेंट, जुना पुना नाका येथील वसंत विहार, ग्रामीण पोलिस मुख्यालयाजवळ, दाजी पेठेतील राघवेंद्र भवनजवळ, सैफुल परिसरातील द्वारकानगर, नवी पेठ, होटगी रोडवरील आयसीआयसीआय बॅंकेच्या जवळ, विजापूर रोडवरील शांती नगर, होटगी रोडवरील काडादी नगर, स्वामी विवेकानंद नगर, स्वागतनगर, सुनीलनगर, सोमवार पेठ, दमानी नगर, शेळगी परिसरातील महालक्ष्मी सोसायटी, भवानी पेठ, जुना पुना नाका परिसरातील अवंतीनगर, आसरा परिसरातील एन.जी. हौसिंग सोसायटी या परिसरात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

महापालिका हद्दीतील 406 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 1 हजार 23 जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या, कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 5 हजार 22 एवढी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT