Investigation of Mangalvedha theft reveals 12 house burglarie12 lakh good seized award to two police officers sakal
सोलापूर

Solapur News : मंगळवेढा चोरीच्या तपासात 12 घरफोड्या उघड, 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत; दोन पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 12 घरफोड्या उघडकीस आणून 12 लाखाचे 25 तोळ्याचे दागिने जप्त

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागात झालेल्या 12 घरफोड्या उघड करुन जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

शहरात माहे जानेवारी महिन्यापासून सायंकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान शिक्षक कॉलनी, मित्रनगर, वनराई कॉलनी,सप्तशृंगीनगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलनी, बनशंकर कॉलनी, तसेच ग्रामीण भागात अचानक भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले.

सदर ठिकाणातील रहिवासी दवाखान्याला अथवा कार्यक्रमाला बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर चोरटे कुलूपबंद बंगले शोधून त्यांना लक्ष करीत असे. भरदिवसा चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.

दरम्यान हे वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पोलीसांचे पथक तयार करुन चोरटयांची शोध मोहिम राबविली.

पोलीसांनी स्थानिक गुन्हे करणार्‍यांकडे गांभीर्यपुर्वक लक्ष ठेवून तांत्रिक बाबीचे गोपनीय बातमीदाराबाबत माहिती काढून दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 12 घरफोड्या उघडकीस आणून 12 लाखाचे 25 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात पोलीसांना यश आले.

दरम्यान मित्रनगर मध्ये एका व्यापार्‍याच्या दुकानाजवळ सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेज ताब्यात घेवून ते पोलीसांनी चेक केले असता त्यामध्ये दोन मुले वारंवार त्या भागातून वारंवार चकरा मारत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासाला भक्कम दिशा मिळाली व त्यातून 12 घरफोड्या ओपन करण्यात पोलीसांना यश आले. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक रणजित माने आदींना या कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT