Issue of CAA, NRC, NPR Began to draw on the head again 
सोलापूर

सीएए,एनआरसी,एनपीआरचा मुद्दा पुन्हा डोके वर काढू लागला

सकाळ वृत्तसेवा

बार्शी ः कोरोना महामारीमुळे थोडा दुर्लक्षीत झालेला सीएए, एनआरसी, एनपीआरचा मुद्दा आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. केंद्रातील भाजप आघाडीच्या विरोधकांनी या मुद्याला पुन्हा विरोधाची हवा देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर जिल्हा कौन्सिलने याविरोधात बुधवारी (ता. 3) एनआरसी,सीएए,एनपीआरला विरोध केला. देशव्यापी विरोध दिनानिमित्ताने हा विरोध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी घरातूनच हातात पोस्टर घेत हा विरोध दर्शवला. 

पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना मेलव्दारे याविषयी विरोधाचे निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,शांततापूर्वक सीएए,एनपीआरला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशात देशद्रोहाचे गुन्हे दाख केले जात आहेत. कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाउन काळात जनतेला दिलासा देण्याऐवजी विरोधी आवाज, आंदोलन सत्ताधाऱ्यांकडून दडपण्यात येत आहे. सीएए विरोधी अंदोलक कार्यकर्त्यांना जेलमधून सोडा, लोकशाहीवादी शक्तींचा आवाज दाबण्याऐवजी प्रवासी श्रमिक, मेहनकश जनतेच्या प्रश्नावर तात्काळ लक्ष द्या, दिल्ली येथील दंग्यातील खऱ्या गुन्हेगारांना अटक करा, सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा, सीएए, एनआरसी, एनपीआर,यूएपीए तातडीने रद्द करा, पुण्यात 2 जून 2014 रोजी मारलेल्या मोहसीन शेख यास न्याय द्या, मारेकऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

भाकप राज्य कौन्सिल कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे, प्रविण मस्तुद यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. शौकत शेख, ए. बी. कुलकर्णी, अनिरूध्द नकाते, लक्ष्मण घाडगे, पवन आहिरे आदिंनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT