Follow these steps and make your learning license at home  
सोलापूर

ऑनलाईन टेस्टमध्ये लर्निंग लायसन्ससाठी 20 पैकी 12 गुणांचे बंधन

तात्या लांडगे

लर्निंग लायसन्ससाठी (वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना) आता आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. वाहनधारकांना स्वत:च्या मोबाईलवरुन ऑनलाइन चाचणी देता येणार आहे. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच लर्निंग परवाना मिळणार आहे.

सोलापूर: नव्याने वाहन शिकलेल्या तरुण-तरुणींना आता आरटीओ कार्यालयात न जाता घरबसल्या लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) काढता येणार आहे. परिवहन सेवामधील 'वाहन' या वेबसाईटवरुन त्यांना तो परवाना काढता येईल. ऑनलाइन टेस्ट देण्यापूर्वी डिजिटल स्वाक्षरी बंधनकारक असून त्यासाठी आधार लिंक करावे लागणार आहे. ऑनलाइन चाचणीत 20 पैकी 12 गुण मिळाल्यानंतर संबंधित व्यक्‍तीला लगेचच ऑनलाइन लर्निंग परवाना मिळेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

परिवहन आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी वाहनधारकांचे आरटीओ कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत, सिस्टिममध्ये पारदर्शकता यावी या हेतूने बऱ्याच सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्ससाठी आता अपॉईंटमेंट घेण्याची गरज नसून संबंधित वाहनधारकाला घरी बसून लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना फिटनेस सर्टिफिकेट म्हणून स्वयंघोषणापत्र द्यावे लागेल. तर व्यावसायिक व मालवाहतूक वाहनाचा परवाना काढताना एमबीबीएस डॉक्‍टरांचे फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

ऑनलाइन टेस्टमुळे संबंधित वाहनधारक त्याच्या सवडीनुसार कधीही टेस्ट देऊ शकतो. या सुविधेचा लाभ अनेकजण घेत असल्याने कार्यालयातील गर्दी कमी झाली असून कार्यालयाबाहेरील एजंटगिरीला आळा बसला आहे. दुसरीकडे ज्यांना ऑनलाइन परवाना काढता येत नाही, त्यांच्यासाठी तालुकास्तरावर कॅम्पचीही सोय करून दिली आहे, असेही डोळे यांनी यावेळी सांगितले. लर्निंग परवाना मिळाल्यानंतर संबंधितांना पक्‍का परवाना काढताना टेस्ट ड्राईव्ह देणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले.

लर्निंग लायसन्ससाठी 'अशी' आहे कार्यपध्दती

- प्रारंभी 'वाहन' वेबसाईटला क्‍लिक केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय निवडावा

- लर्निंग लायसन्सवर क्‍लिक करून संबंधिताने त्याची स्वत:ची माहिती त्याठिकाणी भरावी

- संपूर्ण माहिती भरल्यानंतर लर्निंग लायसन्सचे ऑनलाइन शुल्क संबंधिताला भरावे लागेल

- ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी (व्यावसायिक वाहने सोडून) फिटनेसबाबत स्वंयघोषणापत्र द्यावे

- लर्निंग परवान्यासाठी दोन पर्याय येतात; त्यातून घरी बसून की कार्यालयात जाऊन टेस्ट देणार, यापैकी एक निवडावे

- टेस्ट देण्यापूर्वी डिजिटल स्वाक्षरीसाठी आधार लिंक करावे लागेल; आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याच्याशी संलग्नित मोबाइलवर ओटीपी येईल

- मोबाईलवरील ओटीपी टाकल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी झाल्याचे समजून ऑनलाइन टेस्ट (प्रश्‍नपत्रिका) येईल

- ऑनलाइन टेस्टमध्ये दोन गुणांचे 10 प्रश्‍न असतील; प्रत्येक प्रश्‍नांसाठी 30 सेंकदाचा वेळ दिला जाईल

- टेस्टची वेळ संपल्यानंतर काहीवेळाच रिझल्ट (निकाल) येईल; उत्तीर्ण झालेल्यांना संगणकावरूनच तत्काळ लर्निंग लायसन्स काढता येईल

परिवहन आयुक्‍तांच्या मार्गदर्शनानुसार वाहनचालकांना अधिकाधिक ऑनलाइन सुविधा दिल्या असून त्यामुळे वाहनधारकांची सोय झाली आहे. ऑनलाइन लर्निंग लायसन्स आता घरबसल्या काहीवेळात मिळत असल्याने कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे.

- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT