"ई-क्‍लिनिक'द्वारे समस्या सोडवणे शक्‍य Google
सोलापूर

ऑनलाइन शिक्षणामुळे वाढले आजार! "ई-क्‍लिनिक'द्वारे समस्या सोडवणे शक्‍य

ऑनलाइन शिक्षणामुळे वाढले आजार! "ई-क्‍लिनिक'द्वारे समस्या सोडवणे शक्‍य

तात्या लांडगे

ऑनलाइन शिक्षणाच्या अतिरेकामुळे मुलांमधील शारीरिक व मानसिक आजार तथा विकारांमध्ये वाढ झाली आहे.

सोलापूर : ऑनलाइन शिक्षणाच्या (Online Education) अतिरेकामुळे मुलांमधील शारीरिक व मानसिक आजार तथा विकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या पालकांसह शिक्षकांवरही झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यावर उपाय म्हणून "एज्युकेशनल ई-क्‍लिनिक'ची (Educational e-clinic) संकल्पना राबविण्याची गरज आहे. त्याअंतर्गत टीचर्स क्‍लिनिक (Teachers Clinic), स्टुडंट क्‍लिनिक (Students Clinic) आणि पॅरेंट्‌स क्‍लिनिक (Parents Clinlc) अशा टप्प्यांमधून प्रत्येकाच्या अडचणी सोडविता येणार आहेत. शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या आरोग्यासाठी शासनस्तरावरून ही संकल्पना राज्यभर राबविली जावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी "सकाळ'च्या माध्यमातून व्यक्‍त केली. (It is possible to solve children's health problems through educational e-clinic-ssd73)

कोरोनामुळे (Covid-19) राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा मागील 16 महिन्यांपासून बंद आहेत. शाळा बंद असल्याने मुले घरीच असून त्यांना वेगवेगळ्या सवयी लागल्या आहेत. त्याची पालकांना चिंता लागली असून मुलांमधील एकलकोंडेपणाही वाढला आहे. दुसरीकडे अचानक, कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण दिले नसतानाही शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण बंधनकारक केले. त्यामुळे डोळ्याचे विकार असलेले तथा ज्येष्ठ शिक्षकांची मोठी पंचाईत झाली. त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आरोग्याचे धडेही देण्याची काळाची गरज बनली आहे. त्यातून शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, असा विश्‍वासही शिक्षकांनी या वेळी व्यक्‍त केला. सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिक शिक्षक म्हणतात...

  • शिक्षकांच्या गृहभेटीला पालक वैतागले; ऑनलाइनमुळे रिचार्ज करायला पैसे नसल्याचीही ओरड

  • ऑनलाइन तथा मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढले डोळ्यांचे विकार; विद्यार्थ्यांची मानसिकताही बिघडतेय

  • कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचा भडीमार नकोच; "ई-क्‍लिनिक' संकल्पनेतून विद्यार्थी, पालकांना द्यावेत आरोग्याचे धडे

  • "पक्‍का पाया पहिलीचा' उपक्रमातून शिक्षकांनी जोपासली चिमुकल्यांमधील शिक्षणाची गोडी

  • कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन शिक्षणाला द्यावी परवानगी; शाळा बंदच राहिल्यास ऑनलाइनची सुविधा सर्वांना उपलब्ध करून द्यावी

  • ऑनलाइनच्या प्रयोगामुळे आता शिक्षकांना शाळा बंद असताना अथवा सुट्टी, रजेच्या दिवशीही मुलांना शिकविता येणार

ऑनलाइन शिक्षण हा नवखा प्रयोग असून शिक्षकांपासून ते विद्यार्थी, पालकांना त्याचा त्रास सोसावा लागतोय. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन शिक्षणातूनच विद्यार्थी, पालकांना आरोग्याचे धडे द्यायला हवेत. अभ्यास, पारंपारिक प्रश्‍नोत्तराला बगल देऊन शिक्षण देण्याची गरज आहे.

- राजकिरण चव्हाण, प्राथमिक शिक्षक

ऑनलाइनच्या भडीमारामुळे मुलांच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु, शिक्षण सुरू राहायला हवे, जेणेकरून मुलांमधील शिक्षणाची गोडी टिकेल. परंतु, पहिली ते पाचवीच्या मुलांना कृतीयुक्‍त शिक्षण हवे. ऑनलाइन शिक्षणाचा भडीमार टाळायला हवा.

- अमोल शिंपणे, प्राथमिक शिक्षक

बहुतेक पालकांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत तर रिचार्जसाठी पैसे नसल्याचीही पालकांची ओरड आहे. "पक्का पाया पहिलीचा' या उपक्रमातून चिमुकल्यांची गुणवत्ता जोपासावी. आठवड्यातील तीन दिवस ऑफलाइन शिक्षणाची परवानगी मिळावी.

- गुणवंत चव्हाण, प्राथमिक शिक्षक

ऑनलाइन शिक्षणापेक्षाही ऑफलाइन शिक्षणाची विद्यार्थ्यांना खूप गोडी असते. ऑनलाइनमुळे इतर अडचणी वाढल्या आहेत. तरीही, तंत्रज्ञानातील बदल परिस्थितीनुसार स्वीकारावेच लागतात. आता ऑनलाइनमुळे शिक्षकांना सुट्टीदिवशीही विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल.

- सोमनाथ गुंजोटे, प्राथमिक शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT