सोलापूर

आरे बापरे...यांना शहरात राहणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर सध्या पंढरपुरातील विविध बॅंका आणि शासकीय कार्यालयातील नोकरदार सध्या रोज सोलापूर आणि अन्य गावांतून पंढरपूरला जा-ये करत आहेत. यापुढे संबंधितांना तशी परवानगी दिली जाणार नसून 30 जूनपर्यंत त्यांना पंढरपूर शहरातच राहणे बंधनकारक असेल. सूचनेची दखल न घेतल्यास कार्यालय प्रमुख आणि संबंधित व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिला आहे. 

कार्यालय प्रमुखांची बैठक 
पंढरपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आज पंढरपूर शहरातील सर्व बॅंक शाखा प्रमुख व अन्य कार्यालय प्रमुखांची बैठक नगरपालिकेत घेण्यात आली. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, बॅंक को ऑर्डिनेटर योगेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. पंढरपूर शहरातील सर्व बॅंकेत, शासकीय कार्यालयात अन्य गावातून विशेषतः सोलापूर येथून काही कर्मचारी कामास येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

बॅंकांना व अन्य कार्यालयांना नोटीस 
सोलापुरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिक अथवा बॅंकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. याबाबत इंसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शहरातील बॅंकांना नोटीस बजावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगरपरिषदेने शहरातील सर्व बॅंकांना व अन्य कार्यालयांना नोटीस बजावल्या होत्या. सर्व बॅंकेचे शाखा प्रमुख आणि अन्य शासकीय कार्यालयातील प्रमुखांची बैठक नगरपरिषद सभागृहात आयोजित केली होती. 

अशा सक्त सूचना बैठकीत दिल्या 
बैठकीत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी बॅंकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद रजिस्टरला घ्यावी व त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे. एखाद्या ग्राहकाला ताप असेल तर त्वरित नगरपरिषदेशी संपर्क साधावा. सर्व बॅंकेचे शाखाप्रमुख व अन्य कार्यालयांनी सोलापूर येथून अथवा अन्य गावांतून किती कर्मचारी दररोज ये-जा करतात याची माहिती नगरपरिषदला त्वरित द्यावी. कार्यालयातील अथवा बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांची पल्स ऑक्‍झिमीटरद्वारे तपासणी करण्यात यावी. सर्व एटीएम वेळोवेळी सॅनिटायझर करावेत. प्रत्येक ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर मारून बॅंकेत प्रवेश द्यावा, कर्मचारी व ग्राहकांनी मास्क वापरावे. अशा सक्त सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीस शहरातील सर्व बॅंक शाखा प्रमुख व अन्य कार्यालय प्रमुख हजर होते. 

         ठळक मुद्दे 

  • -बाहेर गावांतून येणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्य कार्यालयात राहावे. 
  • - एखादा कर्मचारी सूचना देऊन अन्य गावातून ये-जा करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्याबाबत तक्रार आल्यास त्याच्यावर व कार्यालय प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन कायदातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. 
  • - सोशल डिस्टन्स राखला जाईल याची दक्षता घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT