limbu vikri.jpg 
सोलापूर

त्यांच्यावर आली लिंबू व कोथींबीर विकण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: हातावरचा धंदा लॉकडाउनने मोडल्याने म. फारूख यांच्यावर लिंबू व कोथिंबीर विकण्याची वेळ आली. सकाळी 11 आधी कुठून तरी लिंबू मिळवायचे व पोलिस येण्याच्या आधी ते विकण्याची धडपड म. फारूख भाई करत आहेत. 

मरिआई चौकाजवळ असलेल्या दर्ग्याच्या बाजूला म. फारूख म. शरीफ यांचा चहाचा गाडा आहे. अनेक वर्षांपासून त्यांचा चहाचा व्यवसाय असून उदरनिर्वाहपुरती कमाई होत असे. मात्र, दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू झाले अन्‌ त्यांचा चहाचा व्यवसाय बंद झाला. पोलिसाकडून सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने साराच कारभार बंद आहे. 

आठपंधरा दिवसांत दुकान उघडता येईल असे त्यांना वाटत होते. शेवटी कंटाळून काहीतरी व्यवसाय करण्यासाठी धावपळ केली. त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्‍त उत्पन्न गटातील केशरी शिधापत्रिकेवर त्यांना दोन महिन्यांत एकदा फक्‍त 25 किलो गहू मिळाले. घरात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असून मुलांचे शिक्षण चालू आहे. सगळा घरखर्च चालवायचा कसा असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 
चहाच्या दुकानासमोर असलेल्या ओट्यावरच दुसरा व्यवसाय करावा याकरिता त्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा काही जणांकडून लिंबू आणून ते विकण्यास सुरवात केली. नंतर कडीपत्ता, तर शेतकऱ्यांकडून कोथिंबीरीच्या पेंढ्या त्यांनी विकत घेतल्या. पण सकाळी माल जमवेपर्यंत उशीर होत असे. नंतर पोलिस विक्रीची वेळ संपल्याचे सांगत. पण तेवढ्यातच माल विक्री करून 50 रुपयांपर्यंत कशीबशी कमाई होऊ लागली. पण तेवढ्यात काहीच भागत नव्हते. कधी जास्त माल घेतल्यास ग्राहक नसल्याने माल आणूनही उपयोग होत नसे. एवढ्या अल्प कमाईत घर भागत नाही. पोलिसांनी माल विकण्यासाठी थोडा वेळ वाढवावा तरच पोटापाण्यापुरते तरी कमावता येईल अशी आशा फारूख भाईंना आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT