Pdr Final Day 
सोलापूर

पंढरीच्या रणांगणाचे आज होणार चित्र स्पष्ट ! सिद्धेश्‍वर आवताडे, गोडसे, नागेश भोसलेंच्या माघारीसाठी मनधरणी

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (ता. 3) अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांवर परिणाम करू शकतील, अशा सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे, सचिन शिंदे आणि नागेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या चार जणांच्या उमेदवारीविषयी उत्सुकता आहे. त्यांच्या माघारीसाठी मनधरणीही करण्यात येत आहे. 

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार (कै.) भारत भालके यांचे पुत्र, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूर- मंगळवेढा तालुक्‍यात मोठी शक्ती असलेल्या आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन गटांना भारतीय जनता पक्षाने एकत्र करून भालके यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बंडखोरी करत अर्ज भरून प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने शैला गोडसे यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. 

तथापि महाविकास आघाडीला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र सचिन शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. गोडसे आणि शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू मंगळवेढा खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरून समाधान आवताडे यांना धक्का दिला आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्यासह काही नेते मंडळींनी प्रयत्न करूनदेखील सिद्धेश्वर आवताडे हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे समाधान आवताडे यांना राजकीय विरोधकांच्या बरोबरच कौटुंबिक बंडाळीलाही सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे. 

आज (शनिवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले असून त्यापैकी किती जण उमेदवारी कायम ठेवतात, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. 

नागेश भोसलेंमुळे वाढली डोकेदुखी 
पंढरपूर नगरपालिकेत परिचारक आघाडीची सत्ता आहे. नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती, पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे. पंढरपूर शहर आणि मतदारसंघातील 22 गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. परिचारकांचे ते कट्ट्रर समर्थक आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याने त्यांच्या उमेदवारीलाही महत्त्व आले आहे. भोसले यांची उमेदवारी समाधान आवताडे यांच्या मतांची विभागणी करण्यासाठी पुढे आली आहे, का भगीरथ भालके यांना शह देण्याच्या हेतूने ते निवडणूक लढवत आहेत, हे आगामी काळात दिसून येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT