आता वृत्तपत्रात खाद्यपदार्थ बांधून मिळणार नाही! आढळल्यास कठोर कारवाई
आता वृत्तपत्रात खाद्यपदार्थ बांधून मिळणार नाही! आढळल्यास कठोर कारवाई Sakal
सोलापूर

वृत्तपत्रात खाद्यपदार्थ बांधून मिळणार नाही! आढळल्यास कठोर कारवाई

तात्या लांडगे

दुकानात, हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यांवर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो.

सोलापूर : दुकानात, हॉटेलमध्ये (Hotel), रस्त्यावरील गाड्यांवर खाद्यपदार्थ (Food) खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा (Newspaper) सर्रास वापर होताना दिसून येतो. मात्र अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी यापुढे वर्तमानपत्र वापरता येणार नाही, कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल (Chemical) असते आणि ते केमिकल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) याबाबत नवीन आदेश काढले आहेत. त्यामुळे आता असे खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याचे सोडून द्यावे लागणार आहे. (It will no longer be a legal offense to tie food in a newspaper)

डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल (Diabutyl Phthalate and Dine Isobutyl) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात, म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टिश्‍यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्यास सुचवले जाते. ही शाई (Ink) पोटात गेल्यास पचनक्रियेत (Digestion) बिघाड होऊ शकतो. या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही (Stomach Disorders) जडू शकतात. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढले आहेत, त्यामध्ये त्यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे.

हॉटेलचालकांनी, दुकानदारांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. आपल्याकडे पोहे, वडे, भजी यांसारखे अनेक गरम पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात बांधून दिले जातात, मात्र त्यातले केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. याबाबतची धोक्‍याची सूचना फूड, सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (Food, Safety and Standards Authority of India) यांनीही याआधीच दिली आहे. त्यामुळे या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत (Pradeepkumar Raut) यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT