potash khat.jpg
potash khat.jpg 
सोलापूर

हे पोटॅश खत नसून अक्षरशः दळलेले मीठ आहे, हो मीठ ! शेतकऱ्याने आणले तहसीलसमोर खताचे पोते 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर): साहेब, आम्ही घेतलेले पोटॅश खत हे पोटॅश खत नसून अक्षरशः दळलेले मीठ आहे हो मीठ! असा आक्रोश करत करमाळा तहसील कार्यालय व करमाळा पोलिस स्टेशन समोर उमरड (ता. करमाळा) येथील शेतकरी विठ्ठल भिमराव बंडगर आख्खा दिवस बसून राहिले. 

संबंधित अधिकाऱ्यांना विश्वास बसावा म्हणून विठ्ठल बंडगर या शेतकऱ्याने 50 किलो बोगस खताची पिशवीच करमाळा पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयासमोर मांडली. बोगस खताची गोणी घेऊन हा शेतकरी दिवस येथेच थांबला होता. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे, सुदर्शन शेळके यांनी बंडगर या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिले. 

करमाळा तालुक्‍यात एकापाठोपाठ एक दोन प्रकारची बोगस खताची विक्री होत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बोगस खत विक्री प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. 
या पुर्वी वाशिंबे येथील खत दुकानदाराकडून एका प्रतिष्ठीत कंपनीच्या नावाचा वापर करून बोगस पोटॅश विक्री होत असल्याच्या प्रकरणी 6 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मागील 15 दिवसात आणखी एका कंपनीच्या नावाचा वापर करून हे बोगस खत विक्री होत असल्याचे उघड झाले असून या ही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तक्रारीची दखल घेतली नाही 
सहा महिन्यांपूर्वी मी वाशिंबे येथून 30 पोते पोटॅश आणले. हे बोगस निघाले म्हणून मी जेऊर पोलिस स्टेशनला जाऊन वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नाही. म्हणून आज मी स्वतःच येथे हे बोगस पोटॅशचे पोते घेऊन आलोय. बोगस खत शेतात घातल्याने माझ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे. 
- विठ्ठल बंडगर, शेतकरी 


पंचनामा केला आहे 
आम्ही श्री.बंडगर यांना महिन्यापासून दोन वेळा फोन केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बुधवारी उमरड येथे जाऊन श्री.बंडगर यांच्या घरी जाऊन पंचनामा केला आहे. बोगस खताच्या बाबतीत तक्रारी माझ्याकडे किंवा माझे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याशी संपर्क साधावा. 
- सुनिल जाधव, सहायक पोलिस निरिक्षक, जेऊर ता. करमाळा 

 कारवाई होणार 
करमाळा तालुक्‍यात बनावट खत विक्री प्रकरणी काही दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माझ्याकडे उमरड येथील विठ्ठल बंडगर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवेदन घेऊन आले होते. त्यांचे निवेदन मी स्वीकारले असून तालुका कृषी अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना बनावट खत गोण्याचे पंचनामे करून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 
- समीर माने, तहसीलदार, करमाळा 
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT