Janata curfew in the wake of the corona virus in Mars
Janata curfew in the wake of the corona virus in Mars 
सोलापूर

Janata curfew : मंगळवेढा शहर व तालुक्यात बंद

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. बंदमुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी राज्य सरकार सतर्क झाले. दोन दिवसापासून शहर व ग्रामीण भागातील बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत असताना कालपासूनच याची सुरुवात शहर व ग्रामीण भागात झाले. ग्रामीण भागातील आठवडे बाजार यापूर्वीच बंद करून जिल्हाधिकारी आदेशाचे अंमलबजावणी केली आहे. तालुक्याच्या दक्षिणा भागातील काही परवागी गेलेले नागरिक येतं गावी परतले आहे. त्यांच्यावर ग्रामीण भागात सध्या लक्ष ठेवण्यात येत आहे. बंदच्या निमित्ताने ग्रामीण भागातील दुधाचे संकलन ही सकाळी सातपूर्वी करण्यात आले. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध संकलनास न गेल्यामुळे त्यांना घरीच ठेवून त्यापासून इतर पदार्थ तयार करण्यासाठी आज कुटुंबासमवेत वेळ मिळाला. नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात संस्थेच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करून त्या संबंधित सर्व साहित्य तयार ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

SCROLL FOR NEXT