jayant patil over vitthal sugar factory abhijit patil solapur Sakal
सोलापूर

Solapur News : अभिजीत पाटील यांना अडचणीत आणण्याचा डाव - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

' विठ्ठल ' चे चेअरमन अभिजित पाटील यांना भिती दाखवून त्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम या लोकांनी केले आहे.

संतोष पाटील

टेंभुर्णी : ' विठ्ठल ' चे चेअरमन अभिजित पाटील यांना भिती दाखवून त्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम या लोकांनी केले आहे. गेले काही महिने त्यांना प्रचंड प्रेशरखाली ठेवण्याचे काम झालेले आहे तरी देखील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा व धैर्यशील मोहिते- पाटील यांचा प्रचार करीत होते.

आता शेवटी सर्वच मार्ग खुंटले मग नाईलाजाने त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे.परंतू त्यांचे कार्यकर्ते, सहकारी हे सगळे आमचे काम करीत असून माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रचंड मतांनी विजयी होतील याची मला खात्री असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिजित पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर टेंभुर्णीतील प्रतिष्ठा लाॅन्स येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, देशात सामान्य माणसाला किराणा,कापड,चप्पल अशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर कर द्यावा लागतो. सरकारकडून श्वास घेण्यावर कर कसा लावता येईल याचा अभ्यास सुरू आहे.

2024 नंतर जर कमळ फुलले तर श्वासावरही कर लावायला हे लोक कमी पडणार नाहीत. कोरोना काळात आम्ही तुम्हाला लस दिल्यामुळे तुम्ही जगला आहात त्यामुळे तुमच्या श्वासावर आमचा अधिकार असून तुम्हाला कर भरावाच लागेल असे म्हणतील. सरकारने कर आकारणी करण्याचे क्षेत्र शिल्लक ठेवलेले नाही.

शेती मालाच्या किंमती कमी करून खत व इतर शेती साधनांच्या किंमती दुप्पट केल्याने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. देशातील प्रत्येक घटक समाधानी नाही. भारतातील मुठभर लोक श्रीमंत झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होत आहे.

माढ्यातील लोक स्वयंस्फूर्तीने व सर्वशक्तीनिशी प्रचार करीत असून माढ्याचा पुढील आमदार तुतारीचाच होणार याची मला खात्री आहे. लोकसभेनंतर राज्यातील वातावरणही बदलेल. राज्यातील 48 जागांपैंकी 32 ते 35 जागा लागतील असा अंदाज असून यामध्ये आणखी वाढ होईल.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या भाजपा व त्यांच्या दोन मित्रांना राज्यातील जनता या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही हे निकालात दिसून येईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, उजनीधरणातील पाण्याचे नियोजन चुकल्यामुळे शेतकर्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी जाती धर्मात भांडणे लावण्याचे काम केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम शरद पवार साहेबच करू शकत असल्याने आम्ही राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे.

टेंभुर्णीतील एमआयडीसीत स्थानिक युवकांना नोकरीची संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच माढा तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून वंचित गावांला पाणी देण्यास मी प्राधान्य देणार असल्याने मला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.

यावेळी टेंभुर्णीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विकास धोत्रे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी

शिवसेनेचे धनंजय डिकोळे,ॲड. बाळासाहेब पाटील,संजय कोकाटे, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे, टेंभुर्णीचे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बोबडे राष्ट्रवादीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक -देशमुख,संदीप साठे आदींची भाषणे झाली

या सभेस समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे,ॲड. बी.डी.पाटील, संजय पाटील घाटणेकर,दादासाहेब साठे, शिवतेज मोहिते पाटील,भारत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, नितीन कापसे,सौदागर जाधव, विलास देशमुख, महेंद्र वाकसे , ॲड. मंगेश देशमुख, बबन गोडसे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हरिदास रणदिवे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख यांनी मानले.

फोटो ओळी - महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णीतील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT